पवारवस्ती, मुंजवडी (फलटण ) येथे अनैतिक संबंधातून झालेल्या वादावादीत एका 60 वर्षीय महिलेचा खून झाला असल्याची घटना घडली आहे. या घटनेतील तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणात अनैतिक संबंधतील संशयित मुलाच्या आईला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती सविस्तर माहिती अशी, दिनांक 19 /03/ 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पवारवस्ती, मुंजवडी येथे फिर्यादी प्रमिला व त्यांचे पती सोमनाथ सस्ते व सीताबाई किसन सस्ते घरामध्ये बसले असताना त्यांच्या घरा शेजारी राहत असलेल्या स्वाती रमेश घुले, आणि फिर्यादीचे पती सोमनाथ किसन सस्ते यांच्यात असलेल्या अनैतिक संबंधच्या कारणावरून चिडून जाऊन रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले यांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून फिर्यादीचे पती सोमनाथ यांना जीवे मारण्यासाठी आले होते.
दरम्यान सस्ते व घुले दोन्ही गटात शाब्दिक चकमक व मारहाणीचा प्रकार सुरु असताना फिर्यादीची सासू सीताबाई किसन सस्ते या मध्यस्ती करत होत्या त्याच वेळी तानाजी घुले याने सीताबाई यांच्या पोटात चाकू खूपसल्याने त्यांचा मृत्यू झाला. फलटण ग्रामीण पोलिसांनी रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले या तिघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही घटना दिनांक 19 रोजी घडली असून या संबंधीचा गुन्हा दिनांक 22 रोजी दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत.