Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

कालगाव येथील शेतकऱ्यांच्या मागणीवर बारा आठवड्यात निर्णय घ्या

उच्च न्यायालयाचे आदेश : याचिकाकर्ते योगेश चव्हाण यांची माहिती
टीम : धैर्य टाईम्स
Decide within twelve weeks on the demand of farmers in Kalgaon
कालगाव, ता. कराड येथील शेतकऱ्यांच्या १२ एकर जमीनीवर १९६८ साली भुसंपादन झाल्याचे आवार्ड दाखवत १ मार्च २०२० रोजी भुमी अधिक्षक कार्यलय व प्रांत कार्यलय यांनी परस्पर फेरफार करत ७/१२ वर रेल्वेचे नाव लावण्यात आल्याने त्याविरुद्ध बाधित शेतकरी योगेश जगन्नाथ चव्हाण व इतर शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कराड : कालगाव, ता. कराड येथील शेतकऱ्यांच्या १२ एकर जमीनीवर १९६८ साली भुसंपादन झाल्याचे आवार्ड दाखवत १ मार्च २०२० रोजी भुमी अधिक्षक कार्यलय व प्रांत कार्यलय यांनी परस्पर फेरफार करत ७/१२ वर रेल्वेचे नाव लावण्यात आल्याने त्याविरुद्ध बाधित शेतकरी योगेश जगन्नाथ चव्हाण व इतर शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना बारा आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते योगेश चव्हाण यांनी दिली.
कालगावचे योगेश चव्हाण व अन्य शेतकऱ्यांनी याबाबत ॲड. योगेश पांडे यांचेमार्फत रिट याचिका दाखल करत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. दरम्यान, याचिकाकर्ते शेतकऱ्यांनी विनंती केल्यास याबाबत जिल्हाधिकारी सुनावणी घेऊ शकतात, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की, केवळ अवार्ड असला म्हणजे भुमी अधिग्रहण झालेले नसते. जमीन कायदा १८९४ मध्ये भुसंपादन बाबत व्यापक प्रक्रीया दिलेली असुन त्याचे पालन केले गेले की नाही हे तपासण्याचे काम शासनाचे आहे. सदर म्हणणे ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस प्रसन्न वराले व न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी याचिकाकर्ते यांना पर्यायी उचित न्यायपिठाकडे नक्कीच दाद मागण्याचा अधिकार असून तो वापरण्यास सुचविले.
याबाबत अधिक माहीती देतांना याचिकाकर्ते योगेश चव्हाण यांनी सांगितले की, आता थेट उच्च न्यायालयानेच आदेश केल्याने आता तरी आमचे म्हणणे शासकिय अधिकाऱ्यांना तसेच इतर न्यायपिठांना ऐकुन घ्यावेच लागेल व कायद्यामधील तरतुदी नुसार निवाडा करत आमच्या सात बारा उताऱ्यावरील परस्पर केलेले फेरफार रद्द करावेच लागतील. याचिकाकर्ते यांचे वतीने ॲड योगेश पांडे व ॲड. लोकेश यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद केला आहे.
शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, विजय पाटिल, जयवंत पाटील, प्रसाद पाटील, लाला पाटील, मनोज ढाणे, रेल्वे प्रकल्प बाधित शेतकरी संघटनचे रामचंद्र माने व कालगांवचे रेल्वे प्रकल्पबाधित शेतकरी यांनी शेतकऱ्यांच्या या कायदेशीर लढाईला साथ दिली असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER