Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

केंद्रीय गृहराज्य मंत्री ना.अजयकुमार मिश्रा फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर

टीम : धैर्य टाईम्स

फलटण : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दि. ५ व ६ जानेवारी रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. फलटण शहरासह तालुक्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या मिशन २०२४ ची सुरवात नुकतीच करण्यात आली असून ही मोहीम आता फलटणमध्ये सुद्धा आली आहे. यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्याकडे फलटणची जबाबदारी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य प्रवास संयोजक माजी आमदार बाळा भेगडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष आमदार सचिन कलयाणशेटटी, सातारा जिल्हा अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत 

२०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी भाजप सज्ज आहे. त्यासाठीच त्यांनी नव्या ‘मिशन १४४’ ची घोषणा केली आहे. या ‘मिशन १४४’ ची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्रात चंद्रपुर येथून करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असणाऱ्या फलटणमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी फलटणमध्ये दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे.

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दि. ५ जानेवारी रोजी सोलापूर येथून सायंकाळी ६ वाजता कोळकी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहावर येणार आहेत, तेथून कोळकी येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय पदक विजेती कु. देविका घोरपडे हिचा ब्राम्हण गल्ली येथील निवासस्थानी यथोचित सत्कार करणार आहेत. सायंकाळी ७.२० वाजता विचार परिवार समन्वय कार्यक्रमास त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी ७.४५ वाजता मारवाड पेठ येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये उपस्थित राहुन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर रात्री ८.२० वाजता कोळकी येथे लोकसभा कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सोयीनुसार हॉटेल जॅक्सन इन येथे मुक्कासाठी जाणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता निंभोरे येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेची पाहणी करणार आहेत. सकाळी ९.१५ वाजता मलठण येथील श्री सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिरात उपस्थित राहुन दर्शन घेणार आहेत. सकाळी १०.३० वाजता फलटण येथील प्रशासकीय कार्यालयांना भेट देणार आहेत व सातारा जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. यांनतर सकाळी ११.४५ वाजता रिंगरोड येथील जनऔषधी केंद्राला भेट देणार आहेत. दुपारी १२.३० वाजता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभर्त्यांशी महाराजा मंगल कार्यालय येथे संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ०२.१५ वाजता मंगळवार पेठ येथे सचिन अहिवळे यांच्या निवासस्थानी सामाजिक दुर्बल घटकातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सदिच्छा भेट देणार आहेत. दुपारी ३ वाजता फरांदवाडी येथे जल जीवन मिशनचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुणेकडे मार्गस्थ होणार आहेत.अशी माहिती मंडल अध्यक्ष बजरंग गावडे व शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER