बारामती: सर्वोच्च न्यायालयाने आज दुपारी ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के राजकीय आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर गेली अडीच वर्ष अस्वस्थ झालेल्या ओबीसी समाजाला न्याय दिल्याबद्दल या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आणि आपला आनंद व्यक्त करण्यासाठी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरून मिठाई भरून समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल लडकत, काँग्रेसचे महाराष्ट्र ओबीसी सेल उपाध्यक्ष रोहित बनकर, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष दादा राम झगडे, शहराध्यक्ष स्वप्निल भागवत, महिला तालुकाध्यक्ष सौ.वनिताताई बनकर, सौ.सीमाताई पांढरे माळेगाव कारखान्याचे संचालक सागर भोंगळे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री. दादा थोरात, बाळासाहेब चव्हाण पाटील, निलेश टिळेकर, बारामती समता परिषद अध्यक्ष सोनु लोणकर, सागर देवकाते पाटील, तनवीर इनामदार, रियाज शेख, हरून बाबा शेख, नितीन थोरात, गणेश पवार, सामाजिक कार्यकर्ते मोहन शेठ भटियानी, माऊली काळे, लालासाहेब गावडे, विशाल गायकवाड, नानासो गावडे, बाळासाहेब जराड आधी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.