मौजे पार्ले, ता. कराड येथील स्मशानभूमी सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेमधून ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
कराड : मौजे पार्ले, ता. कराड येथील स्मशानभूमी सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेमधून ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या विकासकामाचा मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
यावेळी जेष्ठ नेते अविनाश नलवडे, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सरपंच अश्विनी मदने, उपसरपंच मोहन पवार, रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे, सुनंदा निकम, दादासाहेब निकम, आनंदराव नलवडे, गोरख नलवडे, बाळासाहेब नलवडे, गणपतराव नलवडे, अधिकराव नलवडे, संभाजी नलवडे यांच्यासह ग्रामस्था मोठ्या संख्येने उपस्थित होते.