फलटण प्रतिनिधी:- मौजे मुंजवडी येथे दारू पिवून आरडा-ओरडा करू नको असे म्हणाला म्हणून शिवीगाळ व दमदाटी करत एकाने हातावर चाकू मारून जखमी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास मौजे मुंजवडी ता. फलटण गावाच्या हद्दीत जुन्या स्मशानभुमीच्या समोर हणमंतवाडी रोडवर फिर्यादी शशिकांत गंगाधर रणदिवे (रा. मुंजवडी ता. फलटण) व त्यांचा मित्र अमित मोहन येडे गावतील यात्रेनिमित्त असले तमाशाचा कार्यक्रम पाहुन परत घरी जात असताना संग्राम सखाराम मोरे (रा. करावाघज ता. बारामती) हा दारू पिवुन रस्त्याने आरडा-ओरडा करीत असताना त्यास फिर्यादी शशिकांत रणदिवे यांनी "आरडा-ओरडा करू नको" असे म्हणालेचे कारणावरून चिडुन जावून संग्राम मोरे याने फिर्यादी शशिकांत रणदिवे यांना शिवीगाळ दमदाटी करून चाकु डावे हाताच्या पोटरीवर मारून जखम केली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात संग्राम मोरे याच्या विरोधात शशिकांत रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत.