राष्ट्रपती पदासाठी शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी आज द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
काल खासदारांच्या बैठकीत माझ्यावर काहीही दबाव आला नाही. राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून दबाव टाकला नाही. हा निर्णय आम्ही देशहितासाठी घेतला. शिवसेनेची नेहमीच देशहिताची भूमिका राहीली आहे. आदीवासी समाजातील काही प्रमुख व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि त्यांनी आदिवासींना प्रतिनिधीत्व मिळत आहे, त्यामुळे आपण मुर्मू पाठिंबा द्यावा. आदिवासी केवळ आदिवासी नाहीत ते देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होऊ शकतात अशी त्यांची भुमिका आग्रह झाला, त्या सर्वांचा मान मी ठेवत पाठिंबा दिला आहे. यामागे राजकारण सुरु आहे. माझ्यावर दबाव होता असे म्हटले गेले तर ते चूकीचे आहे. पक्षाच्या पलिकडे जाऊन काम करण्याची शिवसेना प्रमूखांची भूमिका मी पार पाडत आहे. पक्षापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे मी मानतो त्यामुळेच द्रौपदी मुर्मू यांना आमचा पाठिंबा आहे.