फलटण - प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येथिल श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालयातील कृषीदुतांनी मलवडी ( ता. फलटण ) येथे ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत बिचुकले मळ्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध मैदानी खेळ स्पर्धांचे प्रात्यक्षिकांसह धडे दिले.
कृषीदुत ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवित आहेत याचाच एक भाग म्हणुन धावणे , लंगडी , खो खो या मैदानी खेळाचे महत्त्व व आवश्यकता शालेय विद्यार्थ्यांना पटवुन देण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांव्दारे विविध खेळाचे धडे विधार्थाना देत आहेत ग्रामीण भागात आरोग्य पाणी खेळ यासह शेती विषयक महत्वपुर्ण माहिती देणारे विविध उपक्रम राबवित आहेत उपक्रमांना स्थानिक ग्रामस्थ विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कृषीदुत गौरव कापसे , दिग्वीजय गायकवाड , क्षितीज काकडे दिग्वीजय गोडसे , मयुर जगताप , अर्जुन मांजरे , शुभम कुंभार आदी या उपक्रमात सहभागी आहेत