Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

सातारा तालुक्याची सर्व मते सहकार पॅनेललाच मिळतील

आ. शिवेंद्रसिंहराजे : ना. पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ
टीम : धैर्य टाईम्स
All the votes of Satara taluka will be given to the co-operative panel
अजिंक्यतारा साखर कारखाना आणि सूत गिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेले आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोन्ही संस्थांचे काम प्रगतीपथावर नेले आहे.

सातारा : अजिंक्यतारा साखर कारखाना आणि सूत गिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेले आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोन्ही संस्थांचे काम प्रगतीपथावर नेले आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्हा बँकेतही सर्वांच्या साथीने प्रामाणिकपणे काम करून बँक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले. बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी सहकार पॅनेल हाच एकमेव पर्याय असून सातारा तालुक्यातील सर्वच्या सर्व मते सहकार पॅनेललाच मिळतील, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे सातारा तालुक्यातील मतदारांचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, बिनविरोध निवडून आलेले उमेदवार अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, सुरेश सावंत, लहुराज जाधव यांच्यासह प्रदीप विधाते, सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, रामराव लेंभे आदी उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तसेच बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पॅनेलला सहकार्य केले त्यांचेही आभार मानण्यात आले. यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, गेल्या ५- ६ वर्षात बँकेचा चेअरमन म्हणून उल्लेखनीय कामकाज केले. सर्व सहकारी संचालकांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झाले, याचा मला सार्थ अभिमान आहे. बँकेचा इतिहास पाहता राजकारण विरहित कामकाज झाले आहे. राज्य आणि देशात आपल्या बँकेचे नाव अग्रेसर आहे आणि बँकेची घोडदौड कायम ठेवण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे आवश्यक आहे. सातारा तालुक्यातील मतदार विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता सहकार पॅनेलच्या पाठीशी १०० टक्के खंबीरपणे उभे राहतील.
ना. पाटील, आ. मकरंद पाटील आणि आ. शशिकांत शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चेअरमन म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या दूरदृष्टीने सातारा तालुक्यात सहकार क्रांती झाली आहे. त्यांच्या विचाराने जिल्हा बँकेचे कामकाज चालू आहे. बँक कशी चालली आहे, हे सर्वांच्या समोर आहे. सभासद, शेतकरी हित जोपासताना कोरोना, दुष्काळ, पूरपरिस्थिती अशा आपत्कालीन परिस्थितीत बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून येतील हे सांगण्यासाठी कोना जोतिषाची गरज नाही. सर्वांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या पाठीशी उभे राहून सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी सूत्रसंचालन केले. जेष्ठ नेते लालासाहेब पवार यांनी आभार मानले. मेळाव्याला जिल्हा परिषदेचे माजी सभापती सतीश चव्हाण, वनिता गोरे, किरण साबळे पाटील, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, सोनाली नलावडे, मनीषा काळोखे, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, अरविंद जाधव, जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, आशुतोष चव्हाण, अरविंद चव्हाण, मिलिंद कदम, प्रकाश बडेकर, रामभाऊ जगदाळे, विक्रम पवार, सूत गिरणीचे उत्तमराव नावडकर, अजित साळुंखे, दादासाहेब बडदरे यांच्यासह सातारा तालुक्यातील सर्व मतदार, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER