फलटण प्रतिनिधी:- दालवडी येथे दारूची चोरटी विक्री करत असताना एकास पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी 1 लाख 21 हजार 785 रुपये किमतीचा प्रोव्हि माल व छोटा हत्ती वाहन जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 26 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास किसन बाबा येडगे (राहणार दालवडी ता. फलटण,जि. सातारा) हे राहते घराचे आडोशाला वाहन छोटा हत्ती क्रमांक एम एच 04 सीजी 87 83 मध्ये देशी दारूची बेकायदा बिगर परवाना स्वतःच्या आर्थिक फायदा करता चोरटी विक्री करत असताना आढलून आले असता त्यांच्याकडे असणारा 1 लाख 21 हजार 785 रुपये किमतीचा प्रोव्हि माल व छोटा हत्ती वाहन कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला तो जप्त करण्यात आला असून पोलिस कॉन्स्टेबल अमोल हनुमंत देशमुख यानी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास महिला पो.हवा.कदम करीत आहेत.