फलटण प्रतिनिधी - पंचायत समिती म्हणजे सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचे मुख्य कार्यालय सर्वसामान्य जनतेची विकासात्मक कामे याचं कार्यालय मार्फत राबविली जातात मग ती घरकुल योजना असो की रोजगार हमी योजना नाही तर दलित वस्ती सुधार योजना अगदीं पाणी पुरवठा योजना असोत या सर्वच प्रकारच्या योजना याचं कार्यालय मार्फत राबविल्या जातात. मात्र फलटण पंचायत समिती कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असे झालेले आहे.
फलटण पंचायत समिती कार्यालयात सर्वसामान्य जनतेच्या कामांना नेहमीचं बगल दिली जाते. कार्यालयात सर्व सामान्य लोकांना अपमानास्पद वागणूक देणे हा तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना छंद जडला आहे. अनेकांनी आपले काम व्हावे यासाठी आमरण उपोषणाला बसावे लागतं आहे तरी काम होत नाही. तक्रार अर्जांना तर हा विभाग ते तो विभाग असा प्रवास करावा लागत आहे पणं ज्या विभागाचा अर्ज आहे त्या विभागाला कधीचं वेळेवर उत्तर दिले जात नाही उलट त्याला एकतर गहाळ केले जाते किंवा वेळ काढू पणा करत त्याला चालढकल करत तक्रार धारकांना फिरवा फिरवी केली जात आहे.
फलटण पंचायत समितीला कायमस्वरुपी गट विकास अधिकारी मिळत नसल्यामुळे प्रभारी गट विकास अधिकारी सतीश कुंभार यांच्याकडे पदभार असल्यामुळे फलटण पंचायत समितीच्या खुर्चीवर प्रभारी बिडीओ यांचे राज असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभारी गट विकास अधिकारी सतीश कुंभार यांचेकडे पदभार आल्यापासून अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसून नावालाच पंचायत समितीचे काम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक विभागांच्या मध्ये ताळमेळ नसल्याने शासनाची योजना व कामे ही लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नसून पंचायत विभागाचा कारभार कागदावरच पाहायला मिळत आहे. प्रभारी गट विकास अधिकारी सतीश कुंभार यांच्या काळातील अनेक कामांची व अहवालाची चौकशी करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी व्यक्त केली असून फलटण पंचायत गटविकास अधिकारी पदी अधिकाऱ्याची तत्काळ शासनाने नियुक्ती करावी अशी मागणी होताना दिसत आहे.
एकंदरीतच पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराची चौकशी होणार का ? असा सवाल आता फलटण तालुक्यातील नागरिक विचारु लागले आहेत तर आर्थिक देवाण-घेवाणीतूनच विविध योजनांचा लाभ व विविध कामास मंजूरी दिली जात असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. फलटण पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी सतीश कुंभार यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अधिकारी कर्मचारी वर्ग नाराज
फलटण पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी सतीश कुंभार यांनी पदभार स्विकारल्यापासून वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही कामात सतीश कुंभार हे विश्वासात घेत नसल्याचे अनेकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. तर सतीश कुंभार यांच्या मनमानी कारभाराला अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाल्याचे अनेक जण सांगत आहेत तर अनेक लाभांच्या प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांना थेट खाजगी स्वरूपात भेटण्याचा सल्ला प्रभारी देत असल्याची चर्चा आहे.