फलटण | धैर्य टाईम्स |
आज दुपारी बाराच्या दरम्यान फलटण शहरांमध्ये जिओचे नेटवर्क गायब झालेले आहे. गेल्या तासाभरापासून जिओचे नेटवर्क गायब झाल्याच्या तक्रारी युजर्स करत आहेत. फलटण शहर व ग्रामीण भागात जिओची रेंज लपंडाव खेळत आहे.
जिओचे युजर्स बहुसंख्य आहेत. जिओच्या नेटवर्कचे आऊटेज होताच अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेत तक्रारी केल्या आहेत. अनेकांनी सेकंडरी सिम, व्हॉ़ट्सअप कॉलचा आधार घेतला आहे. फलटण मधील काही भागातील सेवा गेल्या तासाभरापासून बंद आहे. एकाच कंपनीवर अवलंबून असलेल्यांची चांगलीय पंचाईत झाली आहे.
जिओकडून अद्याप या समस्येबद्दल काही माहिती आलेली नाही. काही भागात नेटवर्क आहे, तर काही भागातील नेटवर्क गायब झालेले आहे.