Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

हरिनामाच्या गजरात रंगला माऊलींचा रिंगण सोहळा चांदोबाचा लिंबमध्ये पहिले उभे रिंगण उत्साहात

टीम : धैर्य टाईम्स

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगण दुपारी ४ वाजता पार पडले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग...माऊलींच्या आश्‍वांनी घेतलेली दौड...दिंडीतील वारकर्‍यांच्या पायंनी घरलेला ठेका...टाळ-मृदंगांच्या दाटीत रंगलेल्या फुगड्या अन हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात माऊली, माऊलीचा जोरदार गजराने आसमंत दुमदुमत असतानाच टाळमृदंगाचा टिपेला पोहोचलेला नाद आणि जोडीला हातातील भगवी पताका उंचावत तल्लीन नाचणार्‍या वारकर्‍यांच्या जोशात वातावरणातील गारवा अंगावर झेलत दंग झालेला वैष्णवांचा मेळा आणि अश्वांनी केलेली दौड अशा पद्धतीने पार पडलेल्या वारीतील पहिल्या उभ्या रिंगणाने उपस्थितासह वारकर्‍यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण मंगळवार दिनांक ९ रोजी चांदोबाचा लिंब तरडगाव येथे पार पडले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी तळावर आगमन केल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगावाजताच माऊलीच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजवलेल्या रथात ठेवली व लगेचच सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. लोणंदकर नागरिक महिला भाविकांनी ओढ्यापर्यत परंपरेप्रमाणे येत माऊलींचा पालखीला निरोप दिला. माऊलीचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला.फलटणच्या कापडगाव येथील सरहद्दीवर फलटण तालुक्याच्या वतीने आमदार दीपक चव्हाण, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, नगर परिषद मुख्याधिकारी निखिल मोरे, शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमतकुमार शहा, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी स्वागत केले.

पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सार्‍या विठ्ठलभक्त वारकर्‍यांना वेध लागले होते ते उभ्या रिंगणाचे.संपुर्ण पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगण,रिंगणाच्या उत्सुकतेने वारकर्‍यांची पाऊले भराभर चांदोबाच्या लिंबाकडे पडत होती सोहळा पुढे पुढे सरकत होता.रस्त्यांच्या दुतर्फा असणार्‍या स्थानिक नागरिंकामधून आनंद व्यक्त केला जात होता.रस्त्याकडील बाजूला असणार्‍या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूड रंगली होती.

घर तुटकेसे छप्पर,देवाला देवघर नाही,मला दादला नको गं बाई या संत एकनाथ महाराजांच्या भारूडात वैष्णव दंग झाला होता भारूडात रंगत येत होती सोहळा पुढे सरकत चांदोबाचा लिंब येथे आला.या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविंकांनी पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरम्यान माऊलीचां रथ चांदोबाचा लिंब येथे आला गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला तरी अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यंानी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली.कोणतीही सुचना न देता वारकर्‍यांच्या गर्दीतुन हजारो लाखो वारकरी दुतर्फा झाले व अश्‍व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली.दुसरीकडे अश्व धावणार असलेल्या मार्गावर रंगावलीच्या स्वयंसेवकांनी रंगीबेरंगी रांगोळी घालुन वातावरणात अधिक प्रसन्नता आणली होती. रिंगण लावल्यानतंर रथापुढील २७ दिंड्यांमधून माऊलींचा अश्‍व पुजार्‍यांनी दौडत आणला.

सर्व दिंडीकरांचा टाळ मृदंगाच्या आवाजात माऊलींचा होत असलेला गजर सुरू असतानाच दौडत आलेल्या दोन्ही अश्वांना पाहून वारकरी देहभान विसरून दंग झाले. पाहता पाहता दोन्ही अश्वांनी माऊलींच्या रथाला प्रदक्षिणा घातली व संत ज्ञानेश्वर पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्‍व मागील दिंड्यापर्यत्र नेल्यानंतर माघारी पळत आला.माऊलींच्या रथा जवळ अश्‍व आल्यांनतर सोहळा प्रमुुखानंी अश्‍वास पुष्पहार घालुन खारीक-खोबर्‍याचा नैवद्य दाखविला त्यानंतर अश्‍वाने दौड घेतली.पुढे माऊलींचा अश्‍व व मागे स्वारीच अश्‍व अशी दौड पुर्ण झाली. अश्व दौडत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोहोचताच चोपदारांनी रथावर उभे राहुन हातातील दंड फिरवून रिंगण संपन्न झाल्याचे दर्शवले. यानंतर सोहळा माऊलींचा गजर करत पुढे मार्गस्थ झाला.

अश्‍वास प्रत्यक्ष माऊलींचा आर्शीर्वाद असलेल्या भाविकांनी अश्‍व ज्या ठिकाणाहुन गेला आहे,त्याच्या पायाखालीची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती.ज्ञानोबा माऊली- तुकाराम व पंढरीनाथाच्या जयघोषात सर्व वारकरी तल्लीन झाले होते.अशा तर्‍हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले.या नंतर सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळा तरडगावच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. ग्रामस्थांनी पालखी रथातून खाली उतरवून माऊलीच्या गजरात खांद्यावर घेतली व मेळा वाजत गाजत तालुक्यातील पहील्या मुक्कामासाठी तरडगावात विसवला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER