कराड शहर भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी येथील मुळीक चौकातील ऋषिकेश संतोष मोटेकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी दिले आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा विचार करून भाजपाने ऋषिकेश मोटेकर यांची कराड शहर भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल ऋषिकेश मोटेकर यांचे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर,कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विशाल कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कापसे, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे, विवेक भोसले, नितीन शहा, विश्वनाथ फुटाणे, शैलेश गोंदकर, सागर लादे यांनी अभिनंदन केले आहे.