Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

स्वातंत्र्य सैनिकाच्या नातसुनेचे नाव मतदान यादीत जाणीवपूर्वक टाळले

मतदान व पोटनिवडणूक लढवण्यापासून ठेवले वंचित; राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार
टीम : धैर्य टाईम्स
Freedom fighter's granddaughter's name was deliberately avoided in the voting list
नेर, ता खटाव येथील स्वातंत्र्य सैनिकाची नातसून असलेल्या सौ मंजिरी निलेश चव्हाण यांनी नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी दोनवेळा सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केला. तशी पोहोचही घेतली, मात्र जाणीवपूर्वक त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. याबद्दल त्यांनी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.

पुसेगाव : नेर, ता खटाव येथील स्वातंत्र्य सैनिकाची नातसून असलेल्या सौ मंजिरी निलेश चव्हाण यांनी नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी दोनवेळा सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केला. तशी पोहोचही घेतली, मात्र जाणीवपूर्वक त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. याबद्दल त्यांनी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.
या गलथान कारभारामुळे दि. 21 रोजी होणारी नेर ग्रामपंचायत पोटनिवडणुक त्या लढवू शकत नाहीत. तसेच मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे तातडीने पुरवणी यादीत त्यांच्या नावाचा समावेश करावा. अन्यथा नेर ग्रामपंचायत पोटनिवडणूक पुढे ढकला, अशी मागणी सौ. मंजिरी चव्हाण यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणार्‍या नवीन मतदारांच्या, मतदान यादीत नाव नोंदणीचा कार्यक्रम 9 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबवला. नवीन मतदार यादी 1 नोव्हेंबर ला प्रसिद्ध झाली. याच मतदार यादीच्या आधारे दि. 21 डिसेंबर ला राज्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुका होणार आहेत. नेर, ता. खटाव येथील स्वातंत्र्य सैनिक ज्ञानदेव चव्हाण यांच्या स्नुषा कै. सुधाताई प्रकाश चव्हाण या नेर ग्रामपंचायत सदस्या होत्या. त्यांचे दि. 22 मे 2021 ला निधन झाले. त्या जागेवर ग्रामपंचायत पोटनिवडणूक लागलेली आहे. याच जागेवर निवडणूक लढवण्यासाठी सौ. मंजिरी निलेश चव्हाण यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मतदार यादीत नाव नोंदणी साठी संबंधितांकडे दोनवेळा अर्ज दिला. मात्र प्रसिद्ध झालेल्या नवीन मतदार यादीत त्यांच्या नावाचा समावेश जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे दिसून येत आहे. भारतीय घटनेनुसार मला मतदानाचा अधिकार तसेच निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. मात्र जाणीवपूर्वक गलथान कारभार करून मला माझ्या अधिकारापासून वंचित ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी तसेच पुरवणी यादीत माझे नाव समाविष्ट करावे, मगच नेर ग्रामपंचायत ची पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सौ. मंजिरी चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER