फलटण प्रतिनिधी:
मठाचीवाडी येथे एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यानी एकूण 45 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे मठाचीवाडी येथे दिनांक 23 रोजी सकाळी 12 ते दिनांक 24 पहाटे 5.00 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी तुकाराम गणपत भांडवलकर ( रा. मठाचीवाडी तालुका फलटण) येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप उचकटून दरवाजा उघडून आत प्रवेश करून स्वयंपाक खोलीतील लोखंडी वस्तूची कपाटातून चोरी केली तसेच गावातील मोहन दिनकर जाधव यांचे दुकान फोडून 300 रुपये, बजरंग पांडुरंग खाडे यांचे घर फोडून 25000 हजार रूपये, किरण हनुमंत धुमाळ यांचे घर फोडून 10 हजार रुपये असा एकूण 45 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.