Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम

कृष्णा बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा उत्साहात

ना.डॉ. भागवत कराड, ना. देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती
टीम : धैर्य टाईम्स
Krishna Bank's Golden Jubilee Closing Ceremony
शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी ओळख असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने नोव्हेंबर २०२० मध्ये ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले होते. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

कराड : शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी ओळख असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने नोव्हेंबर २०२० मध्ये ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले होते. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कृष्णा बँकेसह सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्था आणि कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था यांचा एकत्रित असा कृष्णा आर्थिक परिवार निर्माण झाला असून, या कृष्णा आर्थिक परिवाराच्या नव्या अद्ययावत कार्पोरेट कार्यालयाची उभारणी कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात करण्यात आली आहे. या नव्या इमारतीचे, तसेच बँकेच्या शाखा विस्तारित कक्षाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यालयाची पाहणी करून बँकेच्या संचालक मंडळाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँकेच्या ५० वर्षांच्या गौरवशाली कार्याचा आढावा घेणाऱ्या माहितीपटाचे प्रदर्शनही करण्यात आले.
यावेळी कर्नाटकचे उद्योगमंत्री ना. मुरुगेश निराणी, केंद्रीय आरोग राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक ओमप्रकाश शेटे, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, श्री. विनायक भोसले, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, जि. प. सदस्या सौ. शामबाला घोडके, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, हेमंत पाटील, प्रदीप थोरात, प्रमोद मा. पाटील, बाळासो पवार, चंद्रहास जाधव, नामदेव कदम, हर्षवर्धन मोहिते, तातोबा थोरात, संतोष पाटील, दिनकर गडाळे, ॲड. विजयकुमार पाटील, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सदस्य गुणवंतराव जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, मुख्य व्यवस्थापक भगवान जाधव, किरण पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER