महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मा. ना. डॉ. नीलमताई गोऱ्हे या आज सातारा दौऱ्यावर होत्या. त्यावेळी फलटण येथील माजी खासदार कै. लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे स्वागत फलटण नगरपरिषदचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ मनीषाताई समशेर नाईक निंबाळकर, कु. ऐश्वर्या नाईक निंबाळकर व रणवीरराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या तसेच स्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी फलटण येथील माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेटी प्रसंगी निंबाळकर कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. यावेळी कै. हिंदुराव ना. निंबाळकर यांच्या स्मृतीना त्यांनी उजाळा दिला.
यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक गटनेते अशोकराव जाधव, भाजपा फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सचिन कांबळे पाटील, सागर शहा, माजी नगरसेवक बाळासाहेब कुंभार, नानासो सस्ते, शंभूराजे बोबडे, युवराज सस्ते, राहुल शहा, निलेश चिंचकर, सागर लंबाते, संतोष जाधव, सुरज तांदळे, सुमित चोरमले, नितीन वाघ यांच्या सह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.