फलटण | धैर्य टाईम्स | ३० डिसेंबर २०२४
भारतीय जनता पार्टीच्या फलटण शहर अनुसूचित जातीसेलच्या सरचिटणीसपदी सिध्दांत मिलींद काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर व फलटण शहराध्यक्ष शहराध्यक्ष माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, धनंजय साळुंखे -पाटील माजी नगरसेवक सचिन अहिवळे, भाग्यवंत काकडे, मिलिंद काकडे, प्रशांत काकडे, सचिन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवडीबद्दल सिद्धांत काकडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.