Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा

पत्रकारांनी बाळशास्त्रींचे काम समजून घ्यावे : राजाभाऊ लिमये पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण संपन्न

टीम : धैर्य टाईम्स


फलटण, दि. 6 (प्रतिनिधी) : 


‘‘6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन नसून ‘दर्पण’ या वृत्तपत्राचा शुभारंभ दिन आहे. बाळशास्त्रींचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी पोंभुर्ले येथे झाला. आजच्या पत्रकार दिनाला काही जण बाळशास्त्रींची जयंती समजतात हे दुर्दैवी आहे. मुंबईत जावून बाळशास्त्री जांभेकरांनी ब्रिटीश काळात ‘दर्पण’ च्या माध्यमातून केलेले काम व्यवस्थित समजून घेवून त्यादृष्टीने आजच्या पत्रकारांनी पत्रकारिता करावे’’, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांनी केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राजाभाऊ लिमये, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या दर्पण’ सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी लिमये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, महाराष्ट्र राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ.प्रियांका धावडे, उपसरपंच सादीक डोंगरकर, अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या कार्यात पत्रकारांनी योगदान द्यावे

राजाभाऊ लिमये पुढे म्हणाले, ‘‘मी सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रात यापूर्वी कार्यरत होतो; 50 हून अधिक वर्षे पत्रकारिता केली. त्यानंतर या सगळ्या कार्यातून निवृत्त झालोय. पण रविंद्र बेडकिहाळ यांच्याकडून सुरु असलेल्या बाळशास्त्री जांभेकरांच्या निष्ठापूर्वक स्मरण कार्याला मी सातत्याने मदत करत असतो. पोंभुर्ले ही बाळशास्त्री या आपल्या आद्यपत्रकाराची जन्मभूमी असल्याने येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या स्मारक कार्यात राज्यातील सर्व पत्रकारांनी आपले योगदान द्यावे’’, असेही आवाहन यावेळी लिमये यांनी केले.

पोंभुर्लेतील पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व : डॉ.जगदीश कदम

डॉ.जगदीश कदम म्हणाले, ‘‘पत्रकारितेची वाट समृद्ध करणार्‍या बाळशास्त्रींचे चरित्र सोप्या भाषेत उपलब्ध करुन देण्याचे काम पत्रकारांसाठी उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे डोळ्याला आरशात पाहिल्याशिवाय आपले काजळ दिसत नाही; त्याप्रमाणे पत्रकारांकडून सुरु असलेले चांगले काम त्यांनाच दाखविणारा आरसा म्हणजे आजचे ‘दर्पण’ पुरस्कार आहेत. बाळशास्त्रींच्या जन्मभूमीत वितरित होणार्‍या या पुरस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व असून याची तुलना इतर कोणत्याही महान पुरस्काराशी होऊ शकत नाही.’’

पत्रकारांनी लोकशिक्षकाची जबाबदारी घ्यावी : सुभाष धुमे

सुभाष धुमे म्हणाले, ‘‘आज बहुताल अस्वस्थ आहे. त्यामुळे पत्रकारांसमोर मोठे आव्हान असून समाजाला नेमकी दिशा देण्याची, त्यांचा संभ्रम दूर करण्याची लोकशिक्षकाची जबाबदारी पत्रकारांनी स्विकारावी. ब्रिटीश राजवटीत बाळशास्त्रींनी समाजपरिवर्तनाचं अभूतपूर्व कार्य केले. तसे कार्य आपण निर्भीडपणे करतो का? याचे आत्मचिंतन प्रत्येक पत्रकाराने करावे. ज्याला न्यायाची गरजं आहे त्याच्यासाठी आपण काम केले तर बाळशास्त्रींचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे.’’

पोंभुर्लेत पत्रकारिता महाविद्यालय सुरु करण्याचा मानस : रविंद्र बेडकिहाळ

रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘बाळशास्त्रींनी मराठी माणसाचा आवाज ब्रिटीश सरकारपर्यंत पोचवण्यासाठी ‘दर्पण’ या मराठी वृत्तपत्राची सुरुवात करण्याचे धाडसी काम केले. शिक्षण, सामाजिक, विज्ञान, पुरातत्त्व संशोधन, धर्मचिकित्सा आणि पत्रकारितेतून समाजजागरण असे काम जांभेकरांनी केले. ‘दिग्दर्शन’ या पहिल्या मराठी मासिकाच्या माध्यमातून पहिले मराठी ग्रंथ समिक्षकही बाळशास्त्री ठरतात. असे विविधांगी बाळशास्त्रींचे काम आजच्या पत्रकारांनी समजून घेणे आवश्यक आहे. गावोगावी विठ्ठलाची मंदीरे असली तरी जसे पंढरपूरच्या मंदीराला विशेष महत्त्व आहे तसेच महत्त्व पोंभुर्ले येथील स्मारकाला असल्याने या मातीतला पुरस्कार पत्रकारांसाठी महत्त्वाचा आहे’’, असे सांगून ‘‘येत्या काळात पोंभुर्ले ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे पत्रकारितेचे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरु करण्याचा आमचा संकल्प आहे’’, असेही बेडकिहाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रारंभी बाळशास्त्रींची पालखी वाद्यांच्या गजरात स्मारकामध्ये आणण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व बाळशास्त्रींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘दर्पण’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले

यामध्ये श्रीकांत रामभाऊ साबळे (आवृत्ती संपादक, दै.पुण्यनगरी, पुणे), दिपक एस. शिंदे (आवृत्ती प्रमुख, दैनिक लोकमत, सातारा), नवनाथ कुताळ (प्रतिनिधी, दै.दिव्यमराठी, श्रीरामपूर), सौ.विमल विठ्ठलराव नलवडे (संपादिका, सा.धनसंतोष, कोरेगाव, जि.सातारा), अ‍ॅड.रोहित शामराव अहिवळे (संपादक, दै.गंधवार्ता, फलटण), यशवंत भिमराव खलाटे - पाटील (प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी, फलटण), आचार्य बाळशास्त्री जांभेकर महिला ’दर्पण’ पुरस्कार श्रीमती शोभना कांबळे, वरिष्ठ उपसंपादक, दैनिक लोकमत, रत्नागिरी ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय धाडसी पत्रकार’ पुरस्कार - डॉ.प्रमोद श्रीरंग फरांदे (वरिष्ठ उपसंपादक, दै.सकाळ, सातारा), आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण’ साहित्यिक पुरस्कार - निर्मलकुमार सूर्यवंशी (रा.हडसणी, ता.हदगाव, जि.नांदेड) यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER