Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

ट्रॅफिक आयलॅन्डचे सुशोभिकरण निश्‍चितच आदर्श व शहराचे सौंदर्यवृध्दी करणारे ठरेल!

खा. उदयनराजे भोसले; शाहुकला मंदिर येथील इमारतीच्या सुशोभिकरणाच्या कामांचा शुभारंभ
टीम : धैर्य टाईम्स
The beautification of Traffic Island will definitely be ideal and beautify the city!
सामाजिक जाणिवेमधुन, सातारच्या सैनिक बँकेच्या माध्यमातुन भिमाबाई आंबेडकर चौकात उभारण्यात येणारे कर्नल आर.डी.निकम ट्रॅफिक आयलॅन्ड व त्या अनुषंगाने करण्यात येणारे सुशोभिकरण निश्‍चितच आदर्श व शहराचे सौंदर्यवृध्दी करणारे ठरेल, असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्‍त केले.

सातारा : सातारा नगरीचा नियोजनबध्द विकास करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची असते. तथापि अन्य संस्था-कंपन्यांचे सामाजिक योगदान लाभल्यास, संयुक्‍त प्रयत्नातुन एखादे उत्कृष्ठ कार्य उभे राहु शकते. सामाजिक जाणिवेमधुन, सातारच्या सैनिक बँकेच्या माध्यमातुन भिमाबाई आंबेडकर चौकात उभारण्यात येणारे कर्नल आर.डी.निकम ट्रॅफिक आयलॅन्ड व त्या अनुषंगाने करण्यात येणारे सुशोभिकरण निश्‍चितच आदर्श व शहराचे सौंदर्यवृध्दी करणारे ठरेल, असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्‍त केले.
सातारा नगरपरिषद आणि सातारची ले.कर्नल आर.डी.निकम सैनिक सहकारी बँकेच्या संयुक्‍त प्रयत्नामधुन सदरबझार येथील भिमाबाई आंबेडकर चौकाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बँकेचे चेअरमन कॅ.उदाजीराव निकम, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे उपस्थित होते.
सातारा शहराचा पूर्व भाग १९ व्या शतकात, अधिक नियोजनपूर्वक वसवण्यात आलेला आहे. तत्पूर्वी १७ व्या शतकात सातारा शहराचा पश्‍चिमभाग वसविण्यात आला होता. सदरबझार भागातील अनेक चौक चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहेच, तथापि सामाजिक दायित्व जपणाऱ्या संस्थांनी पुढे येवून, शहर विकासामध्ये आपले योगदान दिल्यास हे कार्य अधिक सुलभ व गतीने होणार आहे. सातारची ले.कर्नल आर.डी.निकम सैनिक सहकारी बँकेची नाळ फक्त सैनिकांपूरतीच मर्यादित राहीलेली नाही. आजी माजी सैनिकांसह सर्वसामान्य कष्टकऱ्यांपासून अनेक उद्योजक यांना बँकेने आर्थिक भक्‍कम पाठबळ दिलेले आहे. माजी आमदार ले.कर्नल(नि) आर.डी. निकम यांनी मुख्यत्वे सैनिकांचे ब समाजाचे कल्याणाकरीता स्थापन केलेल्या या बँकेचा चेअरमन कॅप्टन(नि) उदाजीराव निकम यांच्या नेतृत्वाखाली १४ जिल्ह्यात विस्तार झालेला आहे. सातारा व सैनिक बँक यांचे अतुट नाते आहे. त्यामुळेच सदरबझार भिमाबाई आंबेडकर चौकाचा विकास नियोजनबध्द करण्याबाबत या बँकेने पुढाकार घेतला आहे. येत्या काही दिवसांत या चौकाचे कर्नल आर.डी.निकम ट्रॅफिक आयलॅन्ड मुळे सौदर्य वाढून, शहराच्या वैभवात अधिक भर पडेल, असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक अँड.डि.जी.बनकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक निशांत पाटील, नगरसेविका स्नेहा नलवडे, माजी नगरसेवक शंकर माळवदे, संजय साठे, सैनिक बँकेचे संचालक सौ.पुष्पाताई निकम, ऑ.कॅप्टन गोपाळ गायकवाड, ऑ.कॅप्टन रामचंद्र पवार, पी.टी. ऑफिसर आशपाक पटेल, हवालदार संपत चव्हाण, व्यवस्थापन समिती सदस्य सार्जंट अँड.भिमराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत देसाई, उपव्यवस्थापक विलास मोटे, कर्नल अरुण जाधव, कमांडंट तानाजी पवार व बँक माजी सैनिक व पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी स्टाफ बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान, सकाळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शाहुकला मंदिर येथील इमारतीच्या बाहेरच्या बाजुने रंगकाम करणे, ऑडिटोरिअम मधील फ्लोअर मॅट बदलणे. व्हिआयपी व्यक्तींसाठी पशुबॅकच्या २५ खुर्चा बसविणे, पूर्णपणे इलेक्ट्रीकवरील फ्रंट कर्टन, मिड कर्टन, बँक कर्टन, सायक्‍्लोरोया कर्टनस्‌ बसवणे, रंगमंचावरील लाईट बार पूर्णपणे इलेक्ट्रीकवर संचलित करणे आदी कामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला.
यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अँड.डि.जी.बनकर, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किशोर शिंदे व सुहास राजेशिर्के, बाळासाहेब कदम, हेमांगी जोशी, संग्राम बर्गे, पंकज चव्हाण, अँड.विनित पाटील यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER