Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील अजित दादांच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का,त्यांचे खूप उपकार सातारा जिल्ह्यावर होते - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाहिली श्रद्धांजली कोळकी येथील दांपत्य अपघातात ठार कर्तव्य बजावत असताना तरडगावच्या सुपुत्रचा दुर्दैवी मृत्यू अजित पवार हे जनतेचे नेते होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर केली पोस्ट - उद्या अंत्यसंस्कार तरडगाव येथे राजेगटाला रामराम करीत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल : ॲड. सौ.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला विकासाचा शब्द जयकुमार या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ तरुण विजयी किंवा विजयाचा तरुण वडजल करांचा भाजपमध्ये प्रवेश, विष्णुपंत लोखंडे व धनंजय साळुंखे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देत आम्ही विकास पुरुष पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे केले स्पष्ट विडणी प्रमाणे धुळदेव,पिंपरद,माझेरी गावाचा विकास होईल, - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग कोळकी गावचे उद्योजक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य उमेशशेठ काशिद यांचा राजेगटाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश राजेगटाला जबर धक्का, दडस वस्ती कुरवली येथील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल, जयकुमार शिंदे अन् युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी हाकेच्या अंतरावर एमआयडिसी होणार असून रोजगाराचा अन पाण्याचा प्रश्न माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुटला आहे - आमदार सचिन पाटील विरोधकांना त्यांची जागा दाखवा : आमदार सचिन पाटील : मुंजवडी येथील कोपरा सभा आम्ही शरद पवारांच्या छताडावर बसून रेल्वे नेली अन तुम्ही फक्त त्यांची चाटायचं काम केले - श्रीमंत रामराजेंवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बोचरी टीका स्व. माजी आमदार चिमणराव कदम यांनी बांधलेले उपजिल्हा रुग्णालय सुरु होऊ दिले नाही अन त्यांचा पुत्र त्यांच्या वळचनीला गेलाय - झिरपवाडी येथे आमदार सचिन पाटील यांचे टिकास्त्र विडणी गणात सचिन अभंग अध्यक्ष यांची प्रचारात मोठी आघाडी, धुळदेव मध्ये तरुण वर्गाने केला विजयाचा निश्चय शिंदेमाळ गावानेच केला भाजपात प्रवेश, स्मिता गायकवाड यांचा विजय सोपा राजे गटाला कोळकीत जोरदार धक्का; युवा नेते अनुप गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जयकुमार शिंदे व युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी, गावागावातून होत आहे मोठ्या जल्लोषात स्वागत विडणी गणातील भाजप उमेदवार सचिन अभंग प्रचाराचा आज शुभारंभ फलटण हादरले! पहिल्या प्रियकर व नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा निर्घृण खून प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड, स्वीकृतपदी सुदाम आप्पा मांढरे, अशोकराव जाधव फलटणच्या उपनगराध्यक्षपदी प्रियदर्शनी रणजीतसिंह भोसले यांची वर्णी लागण्याची चर्चा विष्णू लोखंडे यांनी वाठार निंबाळकर गटातून भरला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज निष्ठावंत शिवासैनीकांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला उमेदवारीच नाही, शिवसैनिक पालकमंत्री यांची तक्रार ना. एकनाथ शिंदे यांना करणार? मोठ्या गावातील लोकांना उमेदवारी दिली जाते, मग छोट्या छोट्या गावातील लोकांनी काय सतरंज्या उचलायच्या का? वाठार निंबाळकर येथे मंगळवार 20 जानेवारी रोजी धर्मनाथ बिजोत्सव, व पालखी सोहळा पिंपरद उड्डाणपुलाखालचे खड्डे : लोक मेल्यावरच प्रशासन जागं होणार का? सुरवडी गणातून उद्योजक शंभूराज बोबडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी फलटण तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन क्षीरसागर यांची निवड विजयी खेचू शकलो नाही, पण खचलोही नाही; पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार – प्रसाद पवार - पाटील मागासवर्गीय विशेष कल्याण समिती नेमावी – नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे कष्ट, निर्भीड लेखणी आणि समाजसेवेचा अखंड प्रवास : ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव भांबुरे सांगवी गावात आदर्श काम केल्याने सनी मोरे यांच्या पत्नी सौ.मनिषाताई मोरे यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी - जनतेतून मागणी फलटण नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावे –श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची मागणी : जिल्हा परिषद पंचायत समिती करीता पन्नास टक्के जागा मिळाव्यात दि हॉकी सातारा संघटनेच्या कु निकिता वेताळ कु. श्रेया चव्हाण व कु अनुष्का केंजळे या तीन महिला खेळाडूंची महाराष्ट्र हॉकी संघात निवड के. बी. बायो ऑर्गेनिक्सकडून 'मायकोरिस'चे लोकार्पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त वाचनालयास पोलीस भरती पुस्तकांची भेट पत्रकार दिनानिमित्त दि. ७ व ८ जानेवारी रोजी फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा; ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात फलटण तालुक्यातील पर्यटना विषयी सुधारणा करण्यासाठी काही मागण्या करण्यात आल्या आहेत.


उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण तालुक्यात तीन धबधबे (वॉटर फॉल) आहेत. यातील दोन धबधबे हे धुमाळवाडी या ठिकाणी आहेत. धुमाळवाडी चे वैशिष्ट्य म्हणजे फळांचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच पाचकुंड व नऊकुंड नावाचे दोन मोठे धबधबे येथे आहेत. या ठिकाणी हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात. तसेच जावली गावाशेजारी एक मोठा धबधबा आहे. परंतु या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगली व फळांची झाडे होती. ती जवळपास सर्व नष्ट झाल्यात जमा झाली आहेत. त्याठिकाणी काही वर्षांपासून काही शेतकऱ्यांनी जमिनी कसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धबधब्याला भेटी देणाऱ्या काही पर्यटकांकडून काही फळे तोडली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या मोठ्या तिन्ही धबधब्यांकडे पर्यटन विभाग, वनविभाग व महाराष्ट्र सरकारने लक्ष दिले तर या तिन्ही ठिकाणी जर कोणी अतिक्रमण केले असल्यास त्या जमिनी वन विभाग व महाराष्ट्र सरकारने तात्काळ ताब्यात घ्याव्यात आणि अतिक्रमण नसल्यास त्या शेतकऱ्यांच्या फळझाडांना संरक्षण देऊन फळांचे गाव (धुमाळवाडी) व जावली गावातील धबधब्यांचा विकास करण्यात यावा. जेणेकरून गावकरी व पर्यटक यांच्यामध्ये भांडणे होणार नाहीत.


 पर्यटकांना वाहने व्यवस्थित लावता येतील व दोन्ही गावच्या नागरिकांना नवीन रोजगार निर्माण होईल. तसेच पर्यटकांचे संरक्षण होईल, होणारी गैरसोय दूर होईल,सर्वात महत्त्वाचे राज्यातून व देशातून या तिन्ही धबधब्यांना पाहण्यासाठी पर्यटक येथे येतील एवढे हे तिन्हीही धबधबे निसर्गाच्या कुशीत दडलेले आहेत. त्यांना पर्यटकांसाठी खुले करून राज्य पर्यटन स्थळ बनवण्यात यावे. तसेच धुमाळवाडी पासून काहीच अंतरावर वारुगड व संतोषगड आहेत. याही किल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा वा किल्ल्यांच्या दुरुस्त्या केल्यास फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल. 


तसेच फलटण पासून काहीच अंतरावर निंभोरे गाव आहे. त्या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची स्थापना केलेली आहे. जागेची कमतरता असल्याने सरकारने या गावात दोन ते दहा एकर जागा संपादित करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणाभूमी उभारण्यात यावी.

फलटण हे महानुभव पंथांची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. म्हणजेच श्री. चक्रपाणी प्रभुंचे जन्मस्थान आहे. या मंदिराला लागूनच बालगंगा नदी गेली आहे. या नदीवरील पुलाची उंची फार कमी आहे. याच पुलावरून श्री राम रथ व घोड्याची यात्रा जाते. काही वेळा जास्तीचा पाऊस झाल्यास दोन्हीही यात्रांच्या मार्गां मध्ये बदल करावा लागतो. त्यामुळे तात्काळ पाच ते सहा फूट उंचीचा पूल बांधण्याचे आदेश करावेत व परिसरात होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात यावे. 

फलटण-कोरेगाव क्षेत्रामध्ये शहरात व गावात ठिकठिकाणी सुलभ शौचालय उभारण्यात यावीत. तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गावर अलटून पालटून चार ते आठ किलोमीटर वर सुलभ शौचालय उभारून देशासाठी पायलेट प्रोजेक्ट निर्माण करावा.


फलटण मधून जाणारी बानगंगा नदी आहे. या नदीचे रूपांतर गटारगंगेत झाले आहे. यातील सर्व घाण काढून स्वच्छ व निर्मळ करून नदीला सुरक्षा भिंती व बंधारे बांधावेत तसेच धरणाचे स्वच्छ पाणी सोडून फलटणकरांना व पर्यटकांसाठी बोटिंग चालू करण्यात यावी. नदीच्या शेजारी नागरिकांसाठी चौपाटी/खाऊ गल्ली तयार करण्यात यावी. या सर्व पर्यटन केंद्रांचा तात्काळ विकास केल्याने फलटणला पर्यटन क्षेत्रात विशेष स्थान मिळेल व काही प्रमाणात रोजगारही निर्माण होईल. त्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती की, फलटणच्या पर्यटन विकासाला तात्काळ मदत करावी अशी मागणी फलटणमधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सोबत सहकारी अमर खंदारे उपस्थित होते.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER