फलटण प्रतिनीधी:-मौजे वडले येथे तलावामधून ३६ हजार रुपये किमतीची एकूण ६१ ब्रास माती व वजा मुरूम ही रात्रीच्या वेळी वाहतूक करून चोरून नेहली व पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला असता शासकीय वाहनासमोर आडवी लावून अडथळा निर्माण केला याप्रकरणी एक जणांचे विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ रात्री १०:४९ वाजण्याच्या सुमारास मौजे वडले ता फलटण गावाच्या हद्दीत जमीन गट नं १०२/२ येथील पिंपळखोरी तलाव मधील महाराष्ट्र सरकार तलाव पड त्यामध्ये गाळाची माती गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून दिवसा माती उचलण्यास परवानगी असताना दत्तात्रेय धोंडीबा काळे (रा. वडले ता फलटण) व तीन अज्ञात व्यक्ती यांनी एक जेसीबी व दोन डंपर यांचे मदतीने तलावामधून काळ्या पांढऱ्या रंगाची माती वजा मुरूम अशी ३६ हजार रुपये किमतीची एकूण ६१ ब्रास माती व वजा मुरूम ही रात्रीच्या वेळी वाहतूक करून चोरून नेहली व पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला असता दत्तात्रय धोंडीराम काळे यांनी त्याची स्कुटी शासकीय वाहनासमोर आडवी लावून अडथळा निर्माण केला अशी फिर्याद तलाठी राहुल भानुदास इंगळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी एक जणांच्या विरोधात दिनांक ५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स.पो. नि हुलगे करत आहेत.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय
सदर गुन्हा दिनांक २६ रोजी घडला असतानाही दहा दिवसानंतर म्हणजे दिनांक ५ रोजी का गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत माहिती मिळू शकली नाही तसेच दत्तात्रेय धोंडीबा काळे व तीन अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असतानाही एक जणास आरोपी करण्यात आले तीन अज्ञात व्यक्ती यांना का आरोपी करण्यात आले नाही. याचबरोबर शासकीय वाहनासमोर आडवी लावून अडथळा निर्माण केला असतानाही शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला नाही एकंदरीतच संपूर्ण प्रकरणावर संशय निर्माण होत असून याबाबत सदरचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय निर्माण होत आहे.