फलटण प्रतिनिधी :
मौजे नाईकबोमवाडी (ता. फलटण )येथुन पाण्याच्या टाकीसह पिकअप गाडी चोरुन नेहल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनाक ११ रोजी रात्री ८:२० वाजण्याच्या सुमाराला मौजे नाईकबोमवाडी गावाच्या हद्दीतून आर के सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी मधून फिर्यादी संदीप उत्तम रणवरे (रा. पिंप्रद तालुका फलटण) यांच्या मालकीची महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी क्रमांक एम एच -११-सी एच- ९५१६ ही गाडी व त्यामध्ये असलेली एक हजार लिटर पाणी क्षमतेची प्लास्टिकची टाकीसह वैभव विष्णु शिंदे (रा. वाडी कुरवली पोस्ट बंडी शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर) याने फिर्यादी गाडी मालक संदीप रणवरे याच्या संमतीशिवाय चोरून नेले प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पो हवा साबळे करत आहेत.