फलटण प्रतिनिधी : क्राईम न्यूज
मलटण येथील फर्निचर दुकानात अज्ञात चोरट्यानी केलेल्या चोरीत मुदेमाल व रोख रक्कम अशी एखून ६५ हजाराची चोरी झाली आहे याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता ते दि.५ रोजीचे सकाळी ११:३० वाजताचे दरम्यान जिंती नाका फलटण येथील मारुती नारायण कचरे (रा. पाण्याचे टाकीजवळ सगुना माता नगर मलटण ता. फलटण) यांच्या ओम गजानन फर्निचर दुकानाचे किचनच्या दरवाज्याचा कोंयडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश करून दुकानातील काच फोडून ५०० रुपये किमतीचे एक फर्निचर चे कटर मशीन ३० हजार रुपये किमतीचे मसाले बनवण्याचे दोन स्टीलच्या मशीन ४ हजार रुपये किमतीचे ५० किलो वजनाचे चार गव्हाची पोती. ३० हजार रुपये रोख रक्कम पाचशे रुपये दराच्या साठ नोटा.५०० रुपये किमतीचे फर्निचर ची बनवण्याचे साहित्य असे एकुण ६५ हजार रुपये किंमतीचे साहित्य पाठीमागील दरवाजा चा कोंयांडा तोडून चोरून घेऊन गेले. याप्रकरणी फिर्यादी मारुती नारायण कचरे यांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पो. ना. घाडगे हे करीत आहेत.