फलटण प्रतिनिधी :
दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी फलटण येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त ध्वजास मानवंदना देताना चक्क हाफ चड्डी व टि शर्ट घालून नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी राष्ट्रीय ध्वज व पर्यायाने देशाचा अपमान केल्याचा प्रकार निदर्शनास आला असून या संबंधित बातम्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्या असून फलटण सह तालुक्यातून या कृतीचा जाहिर निषेध होत आहे तरी अभिजित सोनवणे यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष पांडुरंग अहिवळे यांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या कडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.
पुढे असे या निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार केंद्र शासनाच्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शन सुचना करण्यात आल्या होत्या. या आदेशानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्थांच्या कार्यलयावर तिरंगा फडकाविण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर ध्वजाचा मान सन्मान राखण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या असताना देखील अभिजित सोनवणे यांनी केलेले कृत्य निंदनीय असेच आहे.
१३ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यांची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांची संयुक्त जबाबदारी असताना ध्वजास मानवंदना देताना चक्क हाफ चड्डी व टि शर्ट घालून नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी ध्वजाचा अपमान केल्याची माहिती समोर आली असून ध्वजसंहिता कायदा व राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करत सोनवणे यांच्या वर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.
पुढे निवेदनात असे म्हटले आहे की, राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत भारतीय ध्वजसंहिता 2002, भारतीय ध्वजसंहिता 2006 नुसार अनेक तरतुदी असून राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत ध्वजाचा अपमान व अवमान करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत जेल किंवा दंडात्मक शिक्षा केली जाऊ शकते. ध्वजाचा अपमान करणाऱ्या नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबणाची कारवाई ८ दिवसात करावी अन्यथा दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी फलटण येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.