फलटण प्रतिनिधी -
दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट काम करणारे व निष्कलंक सेवा बजावणारे अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह हे पदक देवुन गौरवण्यात येते. यावर्षी फलटण उपविभागाचे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना हे पदक जाहीर करण्यात आलेले आहे.
राहुल धस यांची सन 2016 मध्ये राज्य सेवा परिक्षेमार्फत पोलीस उपअधीक्षक म्हणुन निवड झाली असुन त्यांनी पोलीस दलात रुजु झालेपासुन प्रथम परिवेक्षाधीन कालावधीत आकोला येथे पुर्ण केला आहे. त्यानंतर उमरगा जि. धाराशिव, अंबेजागाई परळी जि. बीड. दौड जि. पुणे ग्रामीण येथे उत्कृष्ट कामकाज केले असुन त्यामध्ये आजवर अनेक गुन्हयांचा तपास करुन उघडकीस आणून त्यामधील आरोपींना शिक्षा लावलेली आहे. त्यापैकी केज (बीड) येथील खुनाच्या गुन्हयामध्ये 5 लोकांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तसेच मागील आठवडयात अंबेजोगाई येथील बालकांचे लैंगीक अत्याचारातील शिक्षक आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी तुळजापुर बंदोबस्त, मा. पंतप्रधान बंदोबस्त, कोरेगाव भिमा बंदोबस्त व इतर महत्वाचे बंदोबस्त अशा बंदोबस्तामध्ये काम करुन त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होवु देता त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आहे. या त्यांचे आज पर्यंतचे उत्कृष्ट कामकाजाची दखल घेवुन मा. केंद्रीय गृहमंत्री यांनी यापुर्वी राहुल धस यांना केंद्रीय दक्षता पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच याच कामाची दखल घेवुन मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग फलटण यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह हे पदक जाहीर केलेले आहे. तसेच सातारा जिल्हयातील 6 पोलीस अंमलदार यांना सदरचे सन्मान चिन्ह पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांचेकडुन जाहीर करण्यात आलेले आहे.
राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळालेबददल समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलोस अधीक्षक सातारा, फलटण उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.