Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

कराडात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जल्लोषी स्वागत

टीम : धैर्य टाईम्स
Co-operation Minister Balasaheb Patil's warm welcome in Karad
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघातून सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचा  विजय झाला. त्यांनी ८ मतांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला. हा निकाल जाहीर झाला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जल्लोषी स्वागत केले.

कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघातून सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचा  विजय झाला. त्यांनी ८ मतांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला. हा निकाल जाहीर झाला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जल्लोषी स्वागत केले.
सातारा येथे मंगळवारी सकाळी ८ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीस सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरातच कराड सोसायटी गटाचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी प्रतिस्पर्धी  अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा ८ मतांनी पराभव केला. हा निकाल जाहीर होताच कराडात बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. तसेच सोशल माध्यमाद्वारे निकाल सर्वांपर्यंत पोहोचल्याने शहरासह तालुक्यातील सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली.
पालकमंत्री ना. पाटील यांनी मंगळवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी येऊन ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला. त्यांनतर त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची धावती भेट घेत स्वागत सिकारून कार्यकर्त्यांचे आभार मानले.
ना. पाटील दुपारी ते साताऱ्याहून कराडला परतले. येथील कोल्हापूर नाक्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर तेथून सवाद्य मिरवणुकीने ना. पाटील यांनी शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. दरम्यान, शहरातील चौकाचौकात कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले. तसेच नागरिकांनीही त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.
त्यानंतर ना. बाळासाहेब पाटील यांनी स्व. यशवंतराव चव्हाण समाधी, तसेच ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या समाधिस्थळी  पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मंगळवार पेठेत  त्यांच्या निवासस्थानासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांना ना. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करत विजयी घोषणा दिल्या.

डॉ. अतुल भोसले ठरले किंगमेकर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लढतीत राष्ट्रवादीची बाजी
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवला. याठिकाणी सहकारमंत्री आणि अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर या दोन्ही गटांनीही विजयाचा दावा केला होता. दरम्यान, भाजपला विचारात घेतल्याशिवाय जिल्हा बँकेची निवडणूक होऊ शकत नाही, असे सूचक विधान डॉ. अतुल भोसले यांनी केले होते. अखेर ते खरे ठरवत त्यांनी सोसायटी गटातील आपली मते सहकारमंत्र्यांच्या पारड्यात टाकून त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केल्याचे या निकालावरून दिसून आले.
जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून कराड सोसायटी मतदारसंघावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी आपला दावा सांगितला होता. त्यादृष्टीने दोघांनीही आधीपासूनच मोर्चेबांधणीही केली होती. त्यामुळे याच मतदारसंघातून जिल्हा बँकेवर निवडून जाण्यासाठी दोन्हीही नेते शेवटपर्यंत आग्रही राहिले. यामुळे ही निवडणूक दोन्ही नेत्यांसाठीही प्रतिष्ठेची झाल्याने या लढतीकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
माजी सहकारमंत्री स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर कराड सोसायटी मतदारसंघातूनच जिल्हा बँकेवर निवडून गेले. बँकेतील त्यांच्या 54 वर्षाच्या कार्यकाळात विविध पुरस्कार मिळवत जिल्हा बँक नावारूपाला आली. त्यामुळे काकांच्या पश्चात त्यांचे पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना सोसायटी मतदारसंघातून संधी मिळावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जनतेचीही भावना होती. परंतु, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हेही याच मतदारसंघासाठी शेवटपर्यंत आग्रही राहिले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील संभाव्य सामना टाळण्यासाठी दिग्गजांनी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे याठिकाणी अटितटीची लढत अटळ झाल्याने याकडे राज्यातील जनतेचे लक्ष वेधले होते.
जिल्हा बँकेतील कराड सोसायटी मतदारसंघ हा कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विभागाला आहे. यामध्ये १४० मतांपैकी दक्षिणमध्ये 88 उत्तरमध्ये 52 मते आहेत. स्वर्गीय विलासकाकांनी याच मतदार संघातून ५४ वर्षे जिल्हा बँकेचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यातच त्यांचे सोसायटीचे ठरावही जास्त असल्याने या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र होते. दरम्यान, भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांची मते निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात होते. त्यात भाजपला विचारात घेतल्याशिवाय सदर निवडणूक होऊ शकत नसल्याचे डॉ. भोसलेंचे सूचक विधान व मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांनी ठेवलेल्या कमालीच्या सस्पेन्समुळे या निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली होती.
अपेक्षेप्रमाणे कराड सोसायटी मतदारसंघात अत्यंत चुरशीने १०० टक्के मतदान झाले. त्यामुळे नेमका काय निकाल लागणार? याचा अचून अंदाज बांधणे कठीण झाल्याची चर्चा होती. दरम्यान, अगदी शेवटच्या क्षणी डॉ. अतुल भोसले यांनी आगामी निवडणुकांची समीकरणे डोळ्यासमोर ठेवून आपली मते सहकारमंत्र्यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 मते मिळाली. तर उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना 66 मते मिळाली. यामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजयावर शिक्कामोर्तब करत उदयसिंह पाटील यांचा ८ मतांनी पराभव केला. सहकारमंत्र्यांना डॉ. अतुल भोसले यांची मते मिळाल्यानेच त्यांचा विजय झाला असल्याने या निवडणुकीत डॉ. अतुल भोसलेच खऱ्या अर्थाने किंगमेकर ठरल्याचेही दिसून आले.

अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची झुंजार लढत
स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पश्चात यांचे पुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे काकांच्या पश्चात रयत संघटनेसह नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात व निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांभाळण्यात युवा नेते उदयसिंह पाटील यांना कितपत यश येते, याकडेही जिल्ह्यासह राज्यातील जाणकारांचे लक्ष होते. त्यामध्ये उदयसिंह पाटील अगदी खडे उतरले असून अपवाद वगळता त्यांना मिळालेल्या 66 मतांवरून रयत संघटनेसह निष्ठावंतांनीही विविध प्रलोभने, आमिषे झुगारून आपल्या नेत्याला साथ दिल्याचे दिसून आले. त्यामुळे अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर याची झुंजार लढतही या निवडणुकीचे एकप्रकारे फलित ठरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जिल्हा बँक निवडणुकीत आगामी निवडणुकांची जुळवाजुळव  
राजकारणात कोणीही कोणाचा परमनंट शत्रू नसतो, वा मित्र नसतो. हे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सध्या, भाजपमध्ये असलेल्या डॉ. अतुल भोसले यांनी एकेकाळी उत्तरेत बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हापासून अगदी अलीकडे काही वर्षांपर्यंत त्यांच्यामध्ये राजकीय मतभेद राहिले. दरम्यान, अनेकदा स्थानिक पातळीवर भोसले गटाने उंडाळकर गटाशी हातमिळवणी केली. परंतु, आता पुन्हा राजकीय समीकरणे बदलली असून आगामी कराड नगरपालिका, शेती उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह कराड दक्षिण विधानसभेचीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉ. अतुल भोसले यांनी नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरु केल्याचे या निकालावरून स्पष्ट होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER