लोकनेते माजी खासदार कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या आचार व विचारांचा वारसा लाभलेले अभिजीत नाईक निंबाळकर (भैय्या ) यांनी फलटण शहरासह तालुक्यातील युवकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे...
फलटण येथील स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर ( भैय्या ) यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.
अभिजीत नाईक निंबाळकर ( भैय्या ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फलटण शहरासह तालुक्यातील विविध मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिजीत नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार शांताराम शंकर रणवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य पिंपरद, ज्ञानेश्वर भरतराव भगत, संभाजी किसन शिंदे, विकास बाळासो ढमाळ सदस्य, ग्रामपंचायत पिंपरद, पंकज महादेव भगत, नवनाथ विठ्ठल भगत यांनी फलटण येथे केला.
लोकनेते माजी खासदार कै.हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या सामाजिक व राजकीय वारसा अभिजीत नाईक निंबाळकर यांना लाभला असून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अभिजीत भैय्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत नाईक निंबाळकर यांची सामाजिक व राजकीय वाटचाल उल्लेखनीय अशीच आहे.
अभिजीत नाईक निंबाळकर यांच्या आज वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.