फलटण प्रतिनीधी : २५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्रांची छाणनी प्रक्रिया पार पडली यामध्ये दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर प्रमुख तीन उमेदवारांनी एकमेकांच्या नामनिर्देशन पत्रावर हरकती बाबत सुनावणी होऊन तिन्ही प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यांनी सांगितले आहे.
२५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दि ३० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशन पत्रांची छाणनी प्रक्रिया सुरू होती यामध्ये दोन उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले तर प्रमुख तीन उमेदवारांनी एकमेकांच्या नामनिर्देशन पत्रावर हरकती घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांत अधिकारी यांच्या कक्षात तब्बल तीन तास सुनावणी सुरू होती यामधील तिन्ही प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले असून इतर दोन उमेदवारांचे अर्ज मात्र बाद झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या जात प्रमाणपत्रावर विरोधी उमेदवारांनी हरकत घेतली तर रासप चे उमेदवार दिगंबर रोहिदास आगवणे यांच्या स्वयघोषणा पत्रात काही माहिती लपवल्याचा आक्षेप इतर उमेदवारांनी घेतला होता त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या अर्जावर काही तांत्रिक आक्षेप घेण्यात आले होते तीन तासांच्या सुनावणी नंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तिन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले मात्र गौतम वामन काकडे व भिमराव विठ्ठल बाबर यांचे अर्ज अपूर्ण माहिती भरल्याने बाद करण्यात आले आहेत.
दरम्यान तिन्ही प्रमुख उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध हरकती घेतल्याने फलटण निवडणूक कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तब्बल तीन तास सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर तिन्ही पक्षाचे उमेदवार यांच्या वकिलांनी बाजू मांडली यामध्ये तिन्ही अर्ज वैध झाले आहेत.
आज एकूण २६ अर्ज वैध ठरले असून दिनांक ४ नोव्हेंबर रोजी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून दिनांक ४ नोव्हेंबर रोजी किती उमेदवारांमध्ये सुरस होणार हे समजणार आहे.
फलटण कोरेगाव विधानसभेसाठी एकाच नावाचे दोन अर्ज आज रोजी वैध झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दिपक प्रल्हाद चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे तर दिपक रामचंद्र चव्हाण यांचा अपक्ष अर्ज वैध ठरल्याने दोन दिपक चव्हाण व्होटिंग मशीन वर दिसणार असून मतदारांच्यात नाम साधर्म्यमुळे मतदारात संभ्रम निर्माण होऊ शकतो यात शंका नाही.
२५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ अंतिम उमेदवार यादी
१) दिपक प्रल्हाद चव्हाण : राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष
२) प्रतिभाताई सुनिल शेलार : बहुजन समाज पक्ष
3) सचिन सुधाकर पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
४) दिंगंबर रोहिदास आगवणे : राष्ट्रीय समाज पक्ष
५) दिपक रामचंद्र चव्हाण : सनय छत्रपती शासन
६) रमेश तुकाराम आढाव : स्वाभिमानी पक्ष
७) सचिन जालंदर भिसे : वंचित बहुजन आघाडी
८) अमोल कुशाबा अवघडे : अपक्ष
९) अमोल मधुकर करडे : अपक्ष
१०) ऍड आकाश शिवाजी आढाव : अपक्ष
११) ऍड कांचनकन्होजा धोंडीराम खरात : अपक्ष
१२) कृष्णा काशिनाथ यादव : अपक्ष
१३) गणेश नंदकुमार वाघमारे : अपक्ष
१४) गंगाराम अरुण रणदिवे : अपक्ष
१५) चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम भालेराव : अपक्ष
१६) जयश्री दिंगंबर आगवणे : अपक्ष
१७) नितीन भानुदास लोंढे :अपक्ष
१८) नंदू संभाजी मोरे : अपक्ष
१९ ) प्रशांत वसंत कोरगावकर : अपक्ष
२०) बुवासाहेब पंडित हुंबरे : अपक्ष
२१) विमल विलास भिसे / तुपे : अपक्ष
२२) राजेंद्र भाऊ पाटोळे : अपक्ष
२३) रविंद्र रामचंद्र लांडगे : अपक्ष
२४) सूर्यकांत मारुती शिंदे : अपक्ष
२५) हरिभाऊ रामचंद्र मोरे : अपक्ष
२६) हिंदुराव नाना गायकवाड :अपक्ष