फलटण धैर्य टाईम्स -
भारतीय जनता पार्टी फलटण शहर व माऊली फाउंडेशनच्या वतीने वयश्री योजनाच्या फॉर्म भरण्याचा आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती फलटण शहर भाजपचे अध्यक्ष व माऊली फाउंडेशनचे संस्थापक अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये सुमारे १५० लोकांचे फॉर्म भरण्यात आले असून या योजनेनुसार ६५ वर्षावरील नागरिकांना तीन हजार रुपये राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. फॉर्म भरून देण्याचे सोय केल्याबद्दल नागरिकांनी माऊली फाउंडेशनचे धन्यवाद व्यक्त केले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी संगीता भोसले, रसिका भोजने, पल्लवी भोजने, पुनम मोहिते, शितल मोहिते, अस्म शेख, हिना शेख, रूपाली साळुंखे, सुनिता कर्वे, मनीषा करवा, मनीषा नागावकर, हेमा पोद्दार, दिगंबर लाळगे, प्रतीक लाळगे, तजुमल शेख, नितीन चांडक यांच्यासह माऊली फाउंडेशन च्या सर्व ट्रस्टी व फलटण शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.