फलटण प्रतिनिधी :- रस्त्यावरील कचरा टाकला असता विचारले म्हणून एका महिलेस शेजारी राहणाऱ्या दांपत्याने शिवीगाळ दमदाटी करत विट फेकून मारल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास अक्षत नगर कोळकी फलटण ता. फलटण जि. सातारा येथे घरासमोर कंपाउंड मध्ये फिर्यादी संजना विजय खोमणे (रा. अक्षत नगर कोळकी ता. फलटण जि. सातारा) ब्रश करत असताना फिर्यादी सौ शेजारी राहणारे छगन मारुती कोकरे, कमल छगन कोकरे यांनी रस्त्यावरील कचरा टाकला असता विचारले म्हणून चिडून जाऊन दोघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करून कंपाउंड वर ठेवलेल्या मोकळ्या विटा फिर्यादी यांच्याकडे टाकल्याने त्यातील छगन कोकरे यांनी मारलेली एक वीट फिर्यादी यांच्या उजव्या डोळ्याच्या कोरेवर लागून रक्त येऊन जखमी केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. ना तांबे करत आहेत.