साखरवाडी भागात व्यावसायिकांना लक्ष्य करून दहशत पसरविणाऱ्या सुरज वसंत बोडरे व त्यांच्या अन्य १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली असून खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, अपहरण, जबरी दुखापत, जबरी चोरी, मारामारी असे विविध प्रकारचे गुन्हे साखरवाडी भागात बोडरे व त्यांच्या साथीदारांनी केल्याच्या नोंदी पोलिसात आहेत
फलटण प्रतिनिधी : विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या साखरवाडीसह फलटण तालुक्याच्या विविध भागात दहशत पसरविणाऱ्या सुरज वसंत बोडरे व त्याच्यासह अन्य १२ जणांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली असुन या कारवाईमळे तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सदरच्या कारवाई बद्दल फलटण ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
पोलिस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सदरची कारवाई केली असल्याचे समजते.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निर्मिती नंतर पाहिल्यांदाच दोन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. मागील १२ वर्षात अशी एकही कारवाई या पोलिस ठाण्यात झाली नव्हती. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर २३ जानेवारी रोजी दिगंबर आगवणे व त्यांच्या अन्य ६ साथीदारांविरुद्ध या कायद्यांतर्गत कारवाई केली त्यानंतर हि दुसरी कारवाई आहे.
साखरवाडी भागात व्यावसायिकांना लक्ष्य करून दहशत पसरविणाऱ्या सुरज वसंत बोडरे व त्यांच्या अन्य १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली असून खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, अपहरण, जबरी दुखापत, जबरी चोरी, मारामारी असे विविध प्रकारचे गुन्हे साखरवाडी भागात बोडरे व त्यांच्या साथीदारांनी केल्याच्या नोंदी पोलिसात आहेत.
सामुदायिक टोळीव्दारे दहशत पसरविणे गुन्हे करणे या अनेक घटनांचा मोक्का अंतर्गत प्रस्ताव सातारा कार्यालयाने कोल्हापूर परिक्षेत्राकडे दाखल केला होता त्या प्रस्तावास सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली होती मोक्का कायदयाची कलमे लावुन गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.