Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष

सातारा जिल्ह्यांत व परजिल्हयात मोटार सायकल चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलीसांनी पकडली

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्या जोडीचे उत्तम टिम वर्क
टीम : धैर्य टाईम्स
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीसांची कारवाई

फलटण : २४ तास गणपती विसर्जन बंदोबस्त केल्यानंतर क्षणाचीही विश्रांती न घेता, पडत्या मुसळधार पावसात धुमाळवाडी, ता. फलटण येथील ओढयातील पुराच्या पाण्यातून जीवाची पर्वा न करता आरोपींचा पाठलाग करुन आरोपींना शिताफीने पकडून आरोपीकडून मोटार सायकल चोरीचे ९ आणि एच.टी.पी. पंप चोरीचा १ असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण ७ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत एकुण ३ जणांना ताब्यात घेण्यात पोलिस यशस्वी झाले असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे. 

      उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांचे मार्गदर्शन आणि पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीसांची सातत्याने चमकदार कामगिरी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सुरु असताना मोटार सायकल चोरीचे गुन्हयांनी डोके वर काढले होते. 

        मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, सातारा अजय कुमार बन्सल यांनी सूचना दिल्या, त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणा-या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन ते उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे विशेष पथक वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरी अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना संशयीत आरोपी नामे १) श्रेयस उत्तम नाळे रा. दुधेबावी ता. फलटण, २) अमित विठ्ठल हुंबे रा. धुमाळवाडी, ता. फलटण, ३) गणेश अरुण जगदाळे रा. मोगराळे ता. माण यांचा सहभाग असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, त्या माहिती वरुन वरील संशयीत १) श्रेयस उत्तम नाळे रा. दुधेबावी ता. फलटण, २) अमित विठ्ठल हुंबे रा. धुमाळवाडी ता. फलटण, ३) गणेश अरुण जगदाळे रा. मोगराळे ता. माण यांना मुसळधार पावसात धुमाळवाडी येथील ओढ्यातील पुराच्या पाण्यातून जीवाची पर्वा न करता संशयीत आरोपींचा पाठलाग करताना पोलीस नाईक काशीद हे किरकोळ जखमी झाले असताना देखील मनोधैर्य खचू न देता पाठलाग करुन संशयीत आरोपींना शिताफीने पकडले आहे.

       त्यांच्याकडे वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतू त्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी फलटण तालुक्यामध्ये तसेच मुंबई, पुणे शहर, खेडशिवापुर, शिरवळ, इंदापुर या ठिकाणाहून चोरलेल्या एकुण ९ मोटार सायकल व शेतीमध्ये औषध फवारणी साठी लागणारे एच. टी. पी. पंपाचे १ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार विविध गुन्ह्यांतील सुमारे ६ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या ९ मोटार सायकली व १ एच. टी. पी. पंप तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली ८० हजार रुपये किमतीची मोपेड मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.     

     सदरची मोटार सायकल संशयीत आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी वापरलेचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून संशयीत आरोपींचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

       सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अक्षय सोनवणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहा. पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार प्रकाश खाडे, पोलीस नाईक अभिजीत काशिद, पोलीस नाईक वैभव सूर्यवंशी, पोलीस नाईक अमोल जगदाळे, पोलीस कॉस्टेबल महेश जगदाळे, पोलीस कॉस्टेबल विक्रम कुंभार, पोलीस कॉस्टेबल सचिन पाटोळे, पोलीस कॉस्टेबल निखील गायकवाड यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER