फलटण प्रतिनीधी:- मौजे मिरढे येथे विरुद्ध बाजूस जाऊन समोरून धडक देऊन गाडी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एक जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 24 रोजी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमाराला सुमारास मौजे मिरढे तालुका फलटण गावाच्या हद्दीत बस स्टँड जवळ फलटण बाजूकडून मोटार सायकल क्र. एम. ए च.11- सी.वाय 0938 वरून येणारे बाळू कोंडीबा हाके (वय-60 वर्ष, रा. मिरडे) यांना शिंगणापूर बाजूकडून येणाऱ्या बिगर नेमप्लेट शाईन मोटरसायकल स्वार सागर रुपनवर (रा. शिंगणापूर ता. माण) याने त्याचे विरुद्ध बाजूस वेगात चालवून समोरून धडक देऊन स्वतःच्या गंभीर दुखापती व बाळू हाके यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी तसेच दोन्ही वाहनाचे नुकसान झाल्या प्रकरणी सागर रुपनवर (रा. शिंगणापूर ता. माण) यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो. नि रानगट करत आहेत.