फलटण तालुक्यातील डीपी चोरीचा सिलसिला आजही कायमच आहे. आज पुन्हा 100 केव्ही ए क्षमता असलेला इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. काही दिवसापूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण तालुक्यातील चोरी झालेले व नव्याने असे 300 हून अधिक डीपी उपलब्ध झाले होते. त्यामुळे महावितरण मधून पुन्हा खासदार साहेब डीपी मागवा अशीच हाक येणार का? अशी चर्चा फलटण तालुक्यात होऊ लागली आहे
100 केव्ही ए क्षमता असलेला इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर खाली पाडून ट्रान्सफर मधील 2,000/_ रुपये किमतीचे 40 लिटर ऑइल सांडून नुकसान करीत व त्यातील 20,000/_ रुपये किमतीची 50 किलो वजनाची कॉपर वायर कोणीतरी अज्ञात इसमाने काढून चोरून नेहलेली असल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन येथे, मंगेश बबन पखाले वय 36 वर्ष, व्यवसाय - वायरमन म. रा. वि. वि.कंपनी शाखा कार्यालय फलटण ग्रामीण शाखा नंबर 1 रा. कोळकी ता फलटण जिल्हा सातारा. यांनी दिली आहे. सदर गुन्हा दिनांक 06/03/2023 रोजीचे सकाळी 07.00 वा चे पूर्वी मौजे ढवळेवाडी,निंभोरे ता फलटण गावच्या हद्दीतील घडला असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून देण्यात आली. सदर घटनेचा तपास पोलीस नाईक काशीद करीत आहेत.