Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

सांगवी सोसायटीच्या जमिनीची परस्पर विक्री : चेअरमन महादेव कदम यांचा प्रताप

टीम : धैर्य टाईम्स
सांगवी (ता.फलटण)  येथील सांगवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड च्या नावे असणारी सांगवी येथील 94 गुंठे जमिनीची विक्री सांगवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेडचे चेअरमन महादेव विश्वनाथ कदम यांनी परस्पर सोसायटीचा विक्री ठराव तसेच जिल्हा निबंधक तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांची परवानगी नसताना 80 ते 90 लाखांची जमीन 8 लाख दहा हजार रुपये किंमतीत जमिनीची विक्री परस्पर केल्याची घटना घडली असुन याबाबत शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही.

याबाबत तक्रारदार ॲड. हनुमंत शिवाजी जाधव यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, मौजे सांगवी तालुका फलटण येथील गट नंबर 880 मधील 94 गुंठे शेत जमीन चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड सांगवी यांच्या नावे होते सदर जमिनीवर इतर हक्कात "कु. का. क बेकायदेशीर व्यवहार" अशी नोंद तसेच "सहकारी सोसायटी ई करार" व "विकास सो. सांगवी 80 हजार जप्ती आदेश" तसेच "श्रीमंत मालोजीराजे बँक बोजा करिता जमीन जप्त" असा शेरे इतर हक्कात असताना दिनांक 20 मार्च 2023 रोजी सांगवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड सांगवी चेअरमन महादेव विश्वनाथ कदम (राहणार .सांगवी, तालुका फलटण) यांनी स्वप्नील राजीव धिवार (राहणार सांगवी, तालुका फलटण) यांना बाजारभावाने किंमत 80 लाख ते 90 लाख असताना सरकारी किंमत आठ लाख रुपये किंमत दाखवून निव्वळ आठ लाख दहा हजार रुपये किंमत ठरवून त्यापैकी आठ लाख रुपये 20 मार्च 2023 रोजी साठेखत वेळी चेअरमन महादेव कदम यांनी चेकने स्विकारत विक्री केली व उर्वरित दहा हजार रुपये रक्कम खरेदी खतवेळी देण्याचे साठे खतात कबूल केले.

मुळात सांगवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड चेअरमन महादेव विश्वनाथ कदम यांनी सदरच्या साठे खतासोबत सांगवी विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड सांगवीचा कोणत्याही प्रकारचा साठेखत तसेच विक्री व्यावहार बाबत ठराव जोडला नाही तसेच इतर हक्कातील "कु. का. क बेकायदेशीर व्यवहार शेरा कमी करण्याबाबत महसूल विभागाचा आदेश जोडला नाही याचबरोबर जिल्हा निबंधक सहकारी संस्था सातारा व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण यांची जमीन विक्री परवानगी बाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. 

तसेच श्रीमंत मालोजीराजे बँकेचा बोजा जमीन जप्ती हा शेरा असतानाही तो शेरा कमी करणे बाबत अथवा विक्री व साठेखत बाबत कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी अथवा ना हरकत घेतली नाही असे असताना दिनांक 20 मार्च 2023 रोजी सदरच्या जमिनीची दुय्यम निबंधक फलटण यांच्या सोबत परस्पर साठेखताच्या आधारे विक्री केली आहे. याबाबत सांगवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड सांगवी चे सचिव दत्तात्रय बंडगर अथवा संचालक मंडळ यांना याबाबत सर्व प्रकार माहित असताना आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याची माहिती सोसायटीचे सचिव दत्तात्रय बंडगर यांनी दिली आहे.

एखाद्या विविध कार्यकारी सोसायटीच्या नावे असलेली मिळकत परस्पर चेअरमन कदम यांनी विक्री केल्याने फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरणी सखोल चौकशीची आवश्यकता असून चौकशी अंतिम या जबाबदार असणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी तसेच दुय्यम निबंधक कार्यालय ज्या कार्यालयात कोणतेही प्रकारच्या विक्री परवानगी अथवा बोजा कमी करणे बाबतचे पत्र नसताना व्यवहार करण्यात आला तसेच सोसायटीची संचालक मंडळ व सचिव यांनी सदरचा व्यवहार हा झालेला माहीत असतानाही कोणत्याही प्रकारची हरकत अथवा तक्रार संबंधित सहकार विभागाकडे दाखल केली नाही. त्यामुळे एक प्रकारे ह्या व्यवहाराला मुकसंमती दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते अशा सर्वावर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे.

सदर प्रकरणी सोसायटी च्या संचालक मंडळाने व सचिवांनी चेअरमन विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असून सदर व्यवहारात स्वीकारलेले आठ लाख रुपयांचे काय झाले व चेक कोणाच्या नावे देण्यात आला व तो कोणाच्या खात्यात भरून ती रक्कम काढण्यात आली याचीही सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सदर साठेखत व्यवहार हा रद्द करणेबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सक्षम न्यायालयात साठेखत रद्द करून फसवणूक प्रकरणी जबाबदार अशा सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारदार हे गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता ग्रामीण पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असून या घटनेत शहर पोलीसांची भूमिका ही संशयास्पद आहे.

साठेखतात संचालकाच्या साक्षीदार म्हणून सह्या

सदर प्रकरणी झालेल्या साठेखतात खुद्द साक्षीदार म्हणून दिलीप लक्ष्मण सस्ते व दत्तात्रय गणपत मोहिते यांनी सह्या केल्या आहेत यामुळे या विक्री व्यवहारात कुणाकुणाचा व कसा सहभाग आहे याचा उलगडा चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

 

सदर व्यवहारात सचिवाची मूक संमती

सचिव दत्तात्रय मधुकर बंडगर यांना जमीन विक्री व्यवहाराची माहिती असतानाही कोणत्याही प्रकारची तक्रार सहकार विभागाकडे केली नाही तसेच याबाबत हरकत घेतली नाही त्यामुळे संपूर्ण संचालक मंडळ सहसचिव दत्तात्रय बंडगर यांची भूमिका संशयास्पद आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER