माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तब्बल 21 हजार कुटुंबांना दीपावलीनिमित्त किराणा मालाचे किट वाटप केल्याने गोरगरिबांची दीपावली गोड झाल्याचे प्रशंसनीय उदगार सोमवार पेठ फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते देवाण्णा पवार - पाटील यांनी काढले. ते सोमवार पेठ फलटण येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने वाटप करण्यात करण्यात आलेल्या किरणात किट वाटप प्रसंगी धैर्य टाइम्स शी बोलत होते.
याप्रसंगी सोमवार पेठ फलटण या ठिकाणी तब्बल 1500 कुटुंबांना किराणामालाचे कीट चे वाटप देवाण्णा पवार - पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवानेते प्रसाद पवार - पाटील, आरपीआयचे फलटण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, संजय जाधव, उमेश पवार,अनिल पवार, अमेश पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.