30,000/- रु किंमतीची काळी रंगाची होंडा कंपनी शाईन गाडी क्रमांक MH 11 CN 1478 मौजे पिप्रद ता.फलटण येथून चोरी झाल्याची फिर्याद राहुल विनायक भगत यांनी फलटण ग्रामिण पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी 06/09/2022 रोजीचे रात्री 09.00 वा. ते दिनांक 07/09/2022 रोजीचे पहाटे 03.00 वा.चे दरम्यान राहुल विनायक भगत वय 38 वर्ष व्यवसाय शेती राहणार पिप्रद ता. फलटण जि. सातारा यांच्या घरा समोरून मोटार सायकल नंबर MH 11CN 1478 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेहली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहा.पोलीस फौजदार शिंदे करीत आहेत.