फलटण प्रतिनिधी:- कंपनीमध्ये गुंतवलेले 9 लाख रुपये पाच महिन्यात परत करतो व कंपनीत 50 टक्के नफा देतो म्हणून पुण्यातील एकाने आसू येथील एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम शिवाजी पवार ( रा आसु ता फलटण) यांना त्यांचा मावस भाऊ शैलेंद्र गायकवाड यांनी फोनद्वारे सांगितले की सुनिल गौतम सरोदे (रा. आंबेडकर वसाहत आँध पुणे सीटी गणेश खिंड पुणे) हे टाईमएक्सीया कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा.लि. ही कंपनी चालु करणार असुन ते कंपनी चालु करण्यासाठी गुंतवणुकदार शोधत आहेत. त्यांना तुला भेटायचे आहे असे सांगितले व फिर्यादी पवार यांचा मावस भाऊ व सुनिल सरोदे हे भेटण्यासाठी फलटण येथे आले असता त्यावेळी सुनिल सरोदे यांनी सांगितले की तुम्ही कंपनीमध्ये जर 9 लाख रुपये गुंतवणुक केली तर मी तुमचे पैसे पाच महिण्यात परत करतो. तसेच कंपनीच्या होणा-या नफ्यामध्ये 50% रक्कम तुम्हाला देतो असे सांगुन कंपनीच्या संबधित माहिती देवुन सुनिल सरोदे यांनी शुभम पवार यांचा विश्वास संपादन केला.
याबाबत शुभम पवार यांनी विश्वास ठेवुन 19 ऑगस्ट 2021 ते 09/09/2022 रोजी पर्यंत ऑनलाईन तसेच खात्यावर चेक, आर.टी.जी.एस माध्यमातुन HDFC बँक ऑफ इंडिया या खात्यावरुन एकुण रुपये 7 लाख 79 हजार 851 एवढी रोख रक्कम 1 लाख 20 हजार 149 रुपये असे एकुण 9 लाख रुपये सुनिल गौतम सरोदे यांना गुंतवणुक म्हणुन दिले यानंतर काही दिवसानंतर सुनिल सरोदे यांना कंपनीत गुंतवणुक केलेली वरील रक्कम तुम्ही सांगितले प्रमाणे मला परतावा द्या अशी मागणी शुभम पवार यांनी मागणी केली असता गुंतवणुक केलेली रक्कम आज देतो, नंतर देतो असे म्हणुन वेळ काढूपणा केला. याबाबत फिर्यादी शुभम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पलीस ठाण्यात सुनिल गौतम सरोदे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.