Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध :

राजेंची दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाकडून मॅरेथॉन चौकशी

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :- 

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी 5 फेब्रुवारी सकाळी 6 वाजता आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. काल आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तब्बल 17 तास चौकशी केली. आयकर विभागाचे अधिकारी रात्री उशिरा संजीवराजे यांच्या फलटण येथील बंगल्यातून बाहेर पडले. आज दुसऱ्या दिवशीही फलटण येथे सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाची मॅरेथॉन चौकशी सायंकाळी उशिरा पर्यत सुरु होती.त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी संजीवराजे घराबाहेर आले होते, त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केले होते.

याचदरम्यान त्यांच्यावर आयकर विभाग मोठी कारवाई करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्या फलटणसह पुण्यातील घरीही सलग दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

इन्कम टॅक्स विभागाने काल 5 फेब्रुवारी रोजी संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे टाकले होते. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणसह मुंबई आणि पुण्यातील घरावर ही छापेमारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी देखील तपासणी सुरूच आहे.संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर गोविंद दूध डेअरीबाबत चौकशी सुरु आहे. एकाचवेळी फलटण व पुणे येथील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहारांबाबत अधिकारी चौकशी करत आहेत.

संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याताील फलटणमधील ते एक वजनदार नेते आहेत. तर संजीवराजे आणि रघुनाथराजे हे माजी सभापती रामराजे नाईक यांचे चुलत बंधू आहेत.सध्या संजीवराजे व रघुनाथराजे शरद पवारांच्या पक्षात आहेत.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी केंद्रीय तपास यंत्रणा दाखल झाल्यापासून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राजे गट व त्यांच्या विरोधी गटाचे कार्यकर्ते सुद्धा सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत.

 दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील बंगल्यासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये माजी आमदार दिपकराव चव्हाण, माजी सभापती शंकरराव माडकर, सौ. रेश्माताई भोसले, बापूराव गावडे, दत्ता अनपट यांच्यासह विविध मान्यवर दिवसभर ठाण मांडून होते.


 सर्व काही सुरळीत काळजी करू नका - संजीवराजे 

दरम्यान आज दुपारी चौकशी दरम्यान सत्यजितराजे यांच्या सोबत संजीवराजे यांनी बंगल्या बाहेर येत उपस्थित कार्यकर्त्यांना सर्व काही सुरळीत असल्याचे सांगितले. सर्वांनी जेवण करून घ्या काळजी करू नका असे कार्यकर्त्यांना संजीवराजे म्हणाले.यावेळी त्यांचे चिरंजीव सत्यजितराजे नाईक निंबाळकर हेही त्यांच्या सोबत होते.

 याच्यातून काही निष्पन्न होणार नाही - रघुनाथराजे 

 काही चौकशी केली तरी याच्यातून काही निष्पन्न होणार नाही असा विश्वास माध्यमांशी बोलताना रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. हा प्रोसेसचा भाग आहे, साप साप म्हणून भुई धोपटत होते ते तरी बंद झालं असा टोला रघुनाथराजे यांनी विरोधकांना लगावला. सर्व रेकॉर्ड चेक करत आहेत ती लोकही हेल्पफूल आहेत आणि संजीवराजेंकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे असेही रघुनाथराजे म्हणाले. फलटण म्हणजे बिहार नाही त्यांना वाटलं होतं की या ठिकाणी पैशाचे ढीग सापडतील परंतु प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे असे शेवटी रघुनाथराजे म्हणाले.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER