फलटण प्रतिनीधी:- मौजे राजुरी येथे बैलगाडीला एसटी बसने पाठीमागून थडक दिल्याने झालेल्या अपघातात बैलगाडी चालकाचा व एका बैलाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात एसटी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे राजुरी ता .फलटण,जि. सातारा गावचे हद्दीत दीप गार्डन या हॉटेल समोर पुणे पंढरपूर जाणारे रोडवर दिनांक 05/02/2024 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास एसटी ड्रायव्हर भाऊसाहेब श्रीमंत नवत्रे (वय 44 वर्ष, आगार मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर, राहणार रडेडे, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) याने त्याचे ताब्यातील एसटी बस क्रमांक एम.एच.14.बी.टी 3359 ही एसटी बस भरधाव वेगात चालवत सोनू अभिमन्यू सोनवणे (वय 31 वर्ष राहणार बोधवड तालुका भुसावळ जिल्हा जळगाव) हा बैलगाडी घेऊन बरड बाजूकडून राजुरी बाजूकडे घेऊन जात असताना त्याला पाठीमागून जोराची धडक दिली त्यामध्ये सोनू अभिमन्यू सोनवणे गंभीर जखमी झाला व त्यांचा मृत्यू झाला व बैलगाडीला असलेल्या दोन बैला पैकी एका बैलाला गंभीर जखमी झाला व एक देशी जातीचे बैलाचा मृत्यू झाला या प्रकरणी वैभव राजेंद्र गावडे (वय 31 वर्षे व्यवसाय शेती राहणार राजुरी ता. फलटण जि, सातारा) यांनी एसटी ड्रायव्हर भाऊसाहेब श्रीमंत नवत्रे याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.