फलटण प्रतिनिधी :
तब्बल चार वर्ष फरार रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय उर्फ आकाश उर्फ भोऱ्या बापूराव जाधव राहणार मळद ता. बारामती, जि पुणे याला फलटण ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यास अक्षय उर्फ आकाश उर्फ भोऱ्या बापूराव जाधव याच्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.
अक्षय उर्फ आकाश उर्फ भोऱ्या बापूराव जाधव हा आरोपी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये (mpda)सुद्धा कारवाई झालेली आहे. सदर आरोपीच्या पाठीमागे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून होते तो काल त्याच्या घरी आला असता पोलिसांनी त्यास अटक केलेली आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, तात्या कदम नवनाथ दडस यांनी केलेली आहे.