वंचित बहुजन आघाडीच्या फलटण शहराध्यक्षपदी फलटण येथील युवा नेतृत्व उमेश ज्ञानेश्वर कांबळे यांची निवड झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
उमेश कांबळे यांच्यासह 27 जणांची फलटण शहर कार्यकारणी यावेळी रेखा ठाकूर यांनी जाहीर केली आहे.
उमेश कांबळे यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.