फलटण प्रतिनिधी –
लक्ष्मीनगर परिसरातील अरुंधती हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल तसेच विश्व अपार्टमेंटसमोरील खूल्या जागेतील वाढलेली झुडपे, केर-कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये भीती व नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी सापांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारीही वारंवार येत होत्या.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक संदीप चोरमले यांच्या पुढाकाराने संबंधित जागेची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. संबंधित प्लॉट मालकांना विश्वासात घेऊन झुडपे काढणे, कचरा हटविणे आणि परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांनी प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध विकासकामांचा धडाका लावला असून स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जात आहे.
प्रभागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहनही नगरसेवक संदीप चोरमले यांनी केले आहे.













