फलटण तालुक्यातील अतिशय संवेदनशील व जागृत ग्रामसंस्था म्हणून सुपरिचित असणाऱ्या पिंपरद येथील भाजप कार्यकारिणीच्या सभेमध्ये पिंपरद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन व जेष्ठ नेते चंद्रकांत गोविंद भगत यांची भारतीय जनता पक्ष पिंपरदच्या गटनेतेपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल चंद्रकांत भगत यांचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, पिंपरद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जनार्दन भगत, भारतीय जनता पार्टी फलटण तालुका उपाध्यक्ष तुकाराम ढमाळ शंकर भगत, भालचंद्र बोराटे परशुराम कापसे, दत्तात्रेय ढमाळ, राहुल भगत, रवी नाळे, नरेश ढमाळ, सुजित ढमाळ, तुकाराम ढमाळ, दिलीप ढमाळ, गजानन शिंदे, शांताराम उर्फ बंटी रणवरे, माऊली भगत, गजानन शिंदे, संदीप शिंदे ज्ञानेश्वर शिंदे, नवनाथ भगत, लालासाहेब कापसे, पंकज भगत, सागर घनवट, संजय टेंबरे, अतुल घनवट, आकाश घनवट, लक्ष्मण ढमाळ, सचिन शिंदे, अजित बोराटे, विक्रांत मोरे, कुंडलिकराव भगत, मालोजी आडके, जालिंदर ढमाळ, विकास ढमाळ रामभाऊ बोराटे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रकांत भगत यांच्या निवडीबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, यांच्यासह फलटण नगरपरिषदेचे मा. विरोधी पक्ष नेते समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.जिजामाता नाईक निंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे.