फलटण प्रतिनिधी :
फलटण तहसील कार्यालय शेजारी मागील वर्षी जागतिक पर्यावरण दिनचे आऊचीत्य साधून 11 झाडे वृक्षारोपण करून त्यांची वर्षभर निगा राखून आज त्या झाडांना वर्ष पूर्ण झाल्याबाबत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदा काळे तसेच उपविभागीय अधिकारी उपविभाग शिरसदार सोनवणे, शिवाजी जगताप तसेच रामकुंड टॉवर सोसायटीचे सचिव सुहास शेंडगे तसेच रमेश शिर्के, प्राध्यापक जाधव त्याचबरोबर अमित जाधव, भोंगळे यांच्या उपस्थितीत आयोजक अधिवक्ता परिषद फलटण चे अध्यक्ष ॲड.बापूसाहेब सरक, न्याय प्रवाह चे प्रमुख ॲड.सुजाता माने, प्रधानसचिव ॲड. नीरज केसकर ,ज्येष्ठ विधज्ञ ॲड. महेंद्र नलवडे , ॲड.वैशाली गाडे , ॲड. शिंदे, ॲड.भानुदास शिर्के , फलटण वकील संघाचे सचिव ॲड.अक्षय सोनवलकर, ॲड.प्रशांत गडकरी, ॲड.धनाजी अभंग यांच्या उपस्थितीत प्रत्येक झाडास गांडूळ खत व पाणी देऊन झाडाची निगा राखण्याची व झाडाची प्रत्येकाने दखल घेण्याची हमी घेत वातावरण मधील वाढत्या तापमानावाढ याची प्रत्येक नागरिकांनी दखल घेऊन यापुढेही अनेक वृक्षारोपण गावागावात करू यात अशी शपथ घेत एक वर्षांपूर्वी केलेल्या वृक्षारोपण याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.