Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

फलटण येथे महायुतीची प्रचार सांगता सभा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त रविवार दि. ५ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथे दुपारी २ वाजता निवडणूक प्रचार सांगता सभा आयोजित केली असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा संपन्न होणार असल्याची माहिती फलटण -कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांनी दिली आहे.

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ४३ माढा लोकसभा मतदार संघातील भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रमाचा आढावा, प्रचार सांगता सभेचे नियोजन व कार्यकर्त्यांच्या सूचना, अडचणी जाणून घेऊन योग्य उपाय योजना करणे यासाठी हॉटेल निसर्ग, सुरवडी, ता. फलटण येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर समारोप करताना जयकुमार शिंदे यांनी प्रचार सांगता सभेविषयी माहिती दिली. 

आपल्या मतदार संघातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याबरोबर येथे विकासाची अनेक कामे केली असल्याने आणि सर्वसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शब्दाला केंद्र व राज्य सरकारमध्ये खूप मोठे वजन आहे. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयामध्ये तर त्यांच्यासाठी एक खास कप्पा निर्माण झाल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी आवर्जून सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभाशिर्वाद खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याने आणि मतदार संघातील बहुसंख्य मतदार त्यांच्यावर मनापासून प्रेम करीत असल्याने त्यांच्या विजयासंबंधी खात्री झाली आहे, तथापि आता सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर मनापासून काम करुन कमळ या चिन्हाला जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन आ. प्रसाद लाड यांनी यावेळी केले.

यावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश लोकसभा निवडणूक प्रमुख कर्जतकर, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, युवा नेते श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, विक्रम भोसले , भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष पै. बजरंग गावडे, अमोल खराडे ,व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  फलटण येथील प्रचार सांगता सभेसाठी संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघातील भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बंधू - भगिनी, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहील यासाठी सांगता सभेची माहिती माढा लोकसभा मतदार संघातील सर्व ६ विधानसभा मतदार संघात पोहोचविण्याची जबाबदारी संबंधीत पदाधिकारी यांच्यावर बैठकीत सोपविण्यात आली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER