म्हासुर्णे, दि. 19 (वार्ताहर) : म्हासुर्णे (ता. खटाव) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने कोरोना लसीकरण आयोजित करण्यात आले होते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 150 नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
म्हासुर्णे येथे प्रथमच लसीकरण करण्यात आले होते. त्यास म्हासुर्णे ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना दक्षता कमिटी यांचा नियोजनाचा अभाव या लसीकरणाच्या वेळी दिसून आला. काही लोकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून सुद्धा लसीकरण करता आले नाही. कारण, लस पुरवठा कमी असल्यामुळे फक्त 150 लोकांनाच लसीकरणाचा लाभ घेता आला. कोरोना दक्षता कमिटीने नोंद केलेल्या लोकांनाच फक्त लसीकरण देण्यात आले व काही लोकांनी बाहेरून रजिस्ट्रेशन केले होते. त्यांना मात्र लसीकरणापासून वंचित राहावे लागले.
राज्यात संचारबंदी सुरू असताना प्रशासन सांगत आहे. घराबाहेर कोणीही पडू नये. मात्र, काही लोक लसीकरण करण्यासाठी आरोग्य केंद्रापर्यंत यावे लागले. पण पदरात निराशाच, लसीकरण मिळालेच नाही. लोकांचा कोरोना दक्षता कमिटी व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या बद्दलचा नाराजीचा सूर दिसून आला. निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्र व म्हासुर्णे उपकेंद्र कर्मचारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राथमिक शाळेचे शिक्षक, लसीकरण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
या लसीकरण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कोरोना दक्षता कमिटी अध्यक्ष सचिन माने, उपसरपंच विठ्ठल माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, सिकंदर मुल्ला, नलिनी कुलकर्णी, आबा यमगर, शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने, पोलीस पाटील संभाजी माने, प्राध्यापक ज्ञानेश्वर माने, माजी उपसरपंच अजित माने, आलम मुल्ला, अक्षय गायकवाड व निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. कारंडे, ए. पी. काळे, ए. जे. कुंभार व आशा सेविका व प्राथमिक शाळेचे शिक्षक यांच्या उपस्थित करण्यात आले. लसीकरणासाठी पात्र नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन ग्रामपंचायत म्हासुर्णे व कोरोना दक्षता कमिटी म्हासुर्णे यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी महिला व पुरुषांची रक्तदाब, शुगर व ऑक्सिजन लेवल तपासणी केली जात होती. तपासणी केल्यानंतर त्यात योग्य असणार्या नागरिकांची परत नोंद घेऊन त्यांना लसीकरण करण्यात आले. निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण 23 गावे असून दररोज 150 ते 200 लोकांना दररोज लसीकरण केले जात आहे. आठवड्यातून प्रत्येक शनिवार म्हासुर्णे या गावामध्ये लसीकरण सत्र घेण्याचे नियोजन केले जात आहे.