माढा लोकसभा मतदारसंघात झालेली विकास कामे व फलटण,खंडाळा माळशिरस, या तालुक्यांना वरदान ठरलेल्या निरा - देवघर प्रकल्पासाठी नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून 3900 कोटींचा भरून निधी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्याच्या वतीने फलटण येथे शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी जाहीर सत्काराचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आज खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे काका व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांचे वडील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे सेवानिवृत्त सरव्यवस्थापक संपतराव महामुलकर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा होणारा सत्कार सोहळा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.